devotee donated 30 lakhs in 8 months to pandharpur vitthal rukmini mandir  Saam Digital
महाराष्ट्र

Vitthal Rukmini Mandir Pandharpur: विठ्ठल भक्तीतून 8 महिन्यांत 30 लाखांची देणगी, पंढरपूर मंदिर समितीकडून राहुरीमधील भाविकाचा सन्मान

devotee donated 30 lakhs in 8 months to pandharpur vitthal rukmini mandir: पागिरे यांना विठुरायाला देणगी मिळवून देण्याचा छंदच लागला आहे. विठुरायाला देगणी मिळवून देणा-या भागवत पागिरे यांच्या आगळ्यावेगळ्या विठ्ठल भक्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भारत नागणे

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीला मिळणाऱ्या देणगीमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. राहुरी तालुक्यातील भागवत पागिरे या विठ्ठल भक्ताने गेल्या आठ महिन्यांत मंदिर समितीला तब्बल 30 लाख रूपयांची देणगी मिळवून दिली आहे. पागिरेंच्या कार्याचे सर्वत्र काैतुक हाेऊ लागले आहे.

84 वर्षांचे भागवत पागिरे हे निस्मीम विठ्ठल भक्त आहेत. शेतकरी कुटुंब असलेल्या पागिरे यांनी गेल्या आठ महिन्यांत विठुरायाच्या चरणावर तब्बल 30 लाखांची देणगी अर्पण केली आहे.

भागवत पागिरे यांनी स्वतः तीन लाख रूपयांची देणगी देवून सुरुवात केलीच शिवाय त्यांनी आपल्या जवळच्या मित्र आणि नातेवाईकांना देणगी देण्यास प्रोत्साहीत केले आहे. त्यानंतर गेल्या आठ महिन्यांत देणगीचा ओघ वाढला आहे. आज भागवत पागिरे यांनी आणखी एका भाविकाला तीन लाख रूपयांची देणगी देण्यास प्रोत्साहित केले.

भागवत पागिरे यांच्या माध्यमातून गेल्या आठ महिन्यांत मंदिर समितीला तब्बल 30 लाख रूपयांची देणगी मिळाली आहे. विठ्ठल मंदिर समितीला देणगी मिळवून देण्यासाठी पागिरे यांनी आपल्या जवळच्या लोकांना प्रोत्साहित केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT