Nirjala Ekadashi 2024: निर्जला एकादशी निमित्त लाखो भाविक पंढरीत, विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लागताहेत पाच तास

lakhs of devotees in pandharpur today on eve of nirjala ekadashi 2024 : विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर‌ रोडवरील पत्रशेड पर्यंत गेली आहे.
lakhs of devotees in pandharpur today on eve of nirjala ekadashi 2024
lakhs of devotees in pandharpur today on eve of nirjala ekadashi 2024Saam Tv

निर्जला एकादशीच्या निमित्ताने आज (मंगळवार) पंढरपुरात लाखो भाविकांनी गर्दी केली. हरिनामाचा गजर मुखी विठ्ठल विठ्ठल नाम अशा जयघोषात पंढरी नगरी दुमदुमून गेली. विठ्ठल दर्शनासाठी भाविकांना सुमारे पाच तासांचा कालावधी लागत असल्याचे चित्र आहे.

आषाढी एकादशी पूर्वी येणारी निर्जला एकादशीला वारकरी संप्रदायात अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे या एकादशीला सातारा, साेलापूरसह राज्य तसेच परराज्याचील भाविक मोठ्या संख्येने पंढरपूर येत विठ्ठलाचे दर्शन घेतात. आज एकादशीनिमित्त मंदिर परिसर नामदेव पायरी चंद्रभागा वाळवंट हा भाग वारकऱ्यांनी फुलून गेला आहे.

lakhs of devotees in pandharpur today on eve of nirjala ekadashi 2024
Vidhan Sabha Election : अजित पवार गट नकाे! विधानसभा निवडणूक स्वबळावर लढू, भाजप कार्यकर्ते, पदाधिका-यांची मागणी

विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर‌ रोडवरील पत्रशेड पर्यंत गेली आहे. भाविक विठ्ठल नाम घेत हळू हळू पुढे सरकत आहेत. विठ्ठल दर्शनासाठी भाविकांना सुमारे पाच तासांचा कालावधी लागत आहे.

Edited By : Siddharth Latkar

lakhs of devotees in pandharpur today on eve of nirjala ekadashi 2024
ठेकेदारांची शक्ती वाढवण्यासाठी महामार्गाचा घाट, शेतकरी आक्रमक; शक्तीपीठ महामार्ग विरोधात 18 जूनला कोल्हापुरात महामोर्चा (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com