Belagavi Crime Saam Tv
महाराष्ट्र

Shocking: कोर्टात रक्तरंजित थरार! न्यायाधिशांसमोरच महिलेच्या डोक्यात कुऱ्हाड घातली, बेळगावमधील भयंकर घटना

Belagavi Crime: बेळगावमध्ये कोर्टात रक्तरंजित थरार झाल्याची घटना समोर आली आहे. याठिकाणी एका महिलेवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली.

Priya More

Summary -

  • बेळगावमध्ये कोर्टात रक्तरंजित थरार

  • अथणी न्यायालयात महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला

  • हल्ल्यात महिला गंभीर जखमी

  • संपत्तीच्या वादातून बाबासाहेब चव्हाणने मीनाक्षी शिंदेंवर हल्ला केला

रणजित माजगावकर, कोल्हापूर

कोर्टामध्ये सुनावणीदरम्यान न्यायाधिशांसमोच एका महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने महिलेच्या डोक्यात थेट कुऱ्हाड घातली. या घटनेमध्ये महिला गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना बेगळाव जिल्ह्यातील अथणी येथे घडली. या घटनेमुळे बेळगावमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावच्या अथणी न्यायालयात आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. न्यायालयीन कामकाज सुरू असताना महिलेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. न्यायधीशासमोरच एका व्यक्तीने महिलेच्या डोक्यात कुऱ्हाड घातली. या घटनेमुळे न्यायालयात गोंधळ घडाला. जखमी झालेल्या महिलेला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मीनाक्षी रामचंद्र शिंदे (वय ५० वर्षे) असे हल्ला झालेल्या महिलेचे नाव आहे. कोतनटी येथील बाबासाहेब चव्हाण या व्यक्तीने मीनाक्षी यांच्यावर हल्ला केला. संपत्तीच्या वादातून मीनाक्षी आणि बाबासाहेब यांनी न्यायालयात धाव घेतली होती. याच विषयावरून दोघांच्यामध्ये अनेकदा भांडण झाले होते. याचाच राग काढत मीनाक्षी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

आज पाठलाग करत बाबासाहेबने कोर्टात मीनाक्षी यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आपला जीव वाचवण्यासाठी महिला कोर्ट हॉलमध्ये घुसली. प्रधान दिवाणी न्यायाधीशांच्या समोर घडलेल्या घटनेमुळे काही वेळ भीतीचे वातावरण पसरले होते. महिलेवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अथणी पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे कोर्ट परिसरात गोंधळ उडाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT