Nashik Crime: माझा मित्र तुझ्यामुळे जेलमध्ये गेला, मद्यधुंद पोरींचा राडा; मैत्रिणींच्या घरावर फेकले दगड

Nashik Crime: नाशिकच्या सातपूर भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. मद्यधुंद मुलींनी एका तरुणीच्या घरावर दगडफेक केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Nashik Crime:
Drunk girls creating ruckus and pelting stones at a woman’s house in Nashik’s Satpur area; CCTV and mobile footage viral.saam tv
Published On
Summary
  • ही घटना दोन दिवसापूर्वी नाशिकच्या सातपूर परिसरात घडली आहे.

  • पीडित तरुणीची एका अन्सारी मुलाबरोबर मैत्री होती.

  • अन्सारी तुरुंगात गेल्यामुळे चार मुलींनी तरुणीला मारहाण करत तिच्या घरावर दगडफेक केली.

अभिजीत सोनवणे, साम प्रतिनिधी

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणींनी राडा घातलाय. मित्राशी बोलणं बंद केल्यानं आणि मित्र जेलमध्ये गेल्यानं मद्यधुंद मुलींनी एका मुलीच्या घरावर दगडफेक केलीय.या प्रकरणी पीडित मुलीच्या घरच्यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या मुलींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केलीय. राडा घालणाऱ्या मुलींनी तरुणीला मारहाण देखील केली होती. घरावर दगडफेक करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Nashik Crime:
Shocking News : १७ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या, आरोपी निघाला सैन्यदलातील जवान

माझा मित्र तुझ्यामुळे जेलमध्ये गेलाय,असं म्हणत चार मुलींनी एका तरुणीच्या घरावर दगडफेक केलीय. ही घटना दोन दिवसापूर्वी नाशिकच्या सातपूर परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची एका अन्सारी मुलाबरोबर मैत्री होती. मात्र त्यांची मैत्री तुटल्यानं त्या मुलीनं अन्सारीसोबत बोलणं बंद केलं. त्यानंतर अन्सारीने एका मैत्रिणीच्या माध्यमातून त्या तरुणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या मुलीने आपल्या महाविद्यालयातील ओळखीच्या मुलांना याबाबत माहिती.

Nashik Crime:
भेटायला बोलावून फिरायला नेलं, नंतर धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीच्या शरीराचे लचके तोडले

त्या मुलांनी अन्सारीला जाब विचारत गोंधळ घातला. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. याप्रकरणी अन्सारीला जेलमध्ये जावं लागलं. या कारणामुळे अन्सारीच्या मैत्रिणीने मनात राग ठेवून या मुलीला मारहाण केली. तिच्या घरावर दगडफेक करत शिवीगाळ केली. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. पीडित मुलीच्या घरच्यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या मुलींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com