Crime: पप्पा मला सोडा..., फावडा डोक्यात टाकत मुलाला संपवलं; सुनेच्या प्रेमात वेडा झालेल्या सासऱ्याचं भयंकर कृत्य

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये सुनेच्या प्रेमात वेड्या झालेल्या व्यक्तीने आपल्या पोटच्या मुलाची निर्घृण हत्या केली. डोक्यात आणि मानेवर फावड्याने वार करत मुलाला जागीच संपवलं. या घटनेमुळे खळबळ उडाली.
Crime: पप्पा मला सोडा..., फावडा डोक्यात टाकत मुलाला संपवलं; सुनेच्या प्रेमात वेडा झालेल्या सासऱ्याचं भयंकर कृत्य..
Uttar Pradesh Crime Saam tv
Published On

उत्तर प्रदेशातील बिजनोरमध्ये बापलेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. याठिकाणच्या नांगलसोत्री येथील तिसोत्रा ​​गावात एका बापाने आपल्या पोटच्या मुलाची निर्घृण हत्या केली. सुनेच्या प्रेमात वेड्या झालेल्या या व्यक्तीने फावड्याच्या सहाय्याने मुलाची हत्या केली. या भयंकर घटनेने उत्तर प्रदेश हादरले आहे. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर रोजी तिसोतरा ​​गावातील जंगलाजवळ ३० वर्षीय सौरभ तोमरचा मृतदेह आढळून आला होता. सौरभचे वडील सुभाष तोमरने गावात अफवा पसरवली होती की त्याच्या मुलावर जंगलात बिबट्याने हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पण मुलाच्या मृत्यूनंतर सुभाषची अस्वस्थता, अंत्यसंस्कारासाठी घाई आणि मृत सौरभच्या शरीरावर संशयास्पद जखमा दिसून आल्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

Crime: पप्पा मला सोडा..., फावडा डोक्यात टाकत मुलाला संपवलं; सुनेच्या प्रेमात वेडा झालेल्या सासऱ्याचं भयंकर कृत्य..
Mumbai Crime : मध्यरात्री मुंबई हादरली! २७ वर्षाच्या फ्रेंच तरूणीसोबत नको ते केले, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

शवविच्छेदन अहवालातून सौरभवर बिबट्याने हल्ला केला नसून त्याची हत्या झाल्याचे उघड झाले. सौरभच्या डोक्यावर आणि मानेवर फावड्याने अनेक वार केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. सुभाष तोमर बऱ्याच दिवसांपासून आपल्या सुनेवर वाईट नजर ठेवून होता. जेव्हा त्याचा मुलगा सौरभला हे कळले तेव्हा त्याने आपल्या वडिलांना विरोध केला. यावरून घरात अनेक दिवस तणाव होता. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सुनेने स्पष्टपणे म्हटले आहे की, तिच्या नवऱ्याचा जीव तिच्या सासऱ्यांच्या असभ्य वर्तनामुळेच गेला.

Crime: पप्पा मला सोडा..., फावडा डोक्यात टाकत मुलाला संपवलं; सुनेच्या प्रेमात वेडा झालेल्या सासऱ्याचं भयंकर कृत्य..
Crime: अंबरनाथमध्ये कोयता गँगचा थरार, ९ जणांकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

१२ नोव्हेंबर रोजी आरोपी सुभाष सौरभला शेतात घेऊन गेला. त्याने सर्वात आधी त्याच्या पिस्तूलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला पण गोळी चुकली. त्यानंतर त्याने त्याच्या मुलाच्या डोक्यावर आणि मानेवर फावड्याने वार केले. या हल्ल्यावेळी सौरभ ओरडत होता की पप्पा मला मारू नका. पण राक्षसी सुभाष थांबला नाही. हत्येनंतर त्याने मृतदेह घरी आणला आणि बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव रचला आणि सर्वांना तसेच सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी सुभाष विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Crime: पप्पा मला सोडा..., फावडा डोक्यात टाकत मुलाला संपवलं; सुनेच्या प्रेमात वेडा झालेल्या सासऱ्याचं भयंकर कृत्य..
Nashik Crime: माझा मित्र तुझ्यामुळे जेलमध्ये गेला, मद्यधुंद पोरींचा राडा; मैत्रिणींच्या घरावर फेकले दगड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com