Ajit pawar vs Eknath Shinde Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: CM शिंदे, अजित पवारांमध्ये मध्यरात्री खलबतं! प्रफुल पटेल, उदय सामंतांचीही हजेरी; 'वर्षा'वरील बैठकीत काय ठरलं?

Maharashtra Assembly Election 2024: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रसार आणि प्रचारासाठी शिवसेनेकडून बनवण्यात आलेला अहवालावरही उपस्थित नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Gangappa Pujari

वैदेही कानेकर, मुंबई|ता. १२ सप्टेंबर

CM Eknath Shinde Ajit Pawar Meeting: विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊ ठेपल्या असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशातच बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार, प्रफुल पटेल, दादा भुसे, उदय सामंत यांच्यामध्ये महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाची चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री दादा भुसे व मंत्री उदय सामंत यांच्यात बुधवारी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभेची रणनिती, जागा वाटप याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली.

जागा वाटपाआधीच महायुतीमध्ये जागा वाटपावरुन महाभारत पाहायला मिळत आहे. यावरही या बैठकीत चर्चा झाली असू शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यभरात आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर बैठकित सविस्तर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रसार आणि प्रचारासाठी शिवसेनेकडून बनवण्यात आलेला अहवालावरही उपस्थित नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, विधानसभा तोंडावर आली असताना महायुतीमध्ये मात्र वादाच्या ठिणग्या पडत असल्याचे दिसत आहे. विशेषतः अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचा विरोध असून राष्ट्रवादीविरोधात जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली जात आहे. अशातच महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीबाबत विचार सुरू असल्याचीही चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी याबाबत महत्वाचे विधान केले होते. जागा वाटपाचा तिढा सुटत नसेल तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाल्यास वावगे ठरणार नाही, असे खोतकर म्हणाले होते. त्यामुळे आता आगामी काळात महायुतीमध्ये काय निर्णय होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT