Army Officers Thrashed Indore News: गेल्या काही दिवसांपासून देशभरात अत्याचाराच्या घटनांचे सत्र सुरु आहे. एकीकडे कोलकाता घटनेवरुन संताप व्यक्त केला जात असतानाच इंदोरमधून एक भयंकर घटना समोर आली आहे. भारतीय सैन्य दलातील दोन अधिकारी आणि त्यांच्या मैत्रिणींवर हल्ला करत बंदुकीच्या धाकावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना इंदोरमध्ये घडली. इंदूरपासून 50 किमी अंतरावर असलेल्या ऐतिहासिक जाम गेटजवळ मंगळवारी रात्री उशिरा ही भयंकर घटना घडली असून जमावाच्या हल्ल्यात दोन्ही लष्करी अधिकारी जखमी झाले आहेत. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरु आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दोन्ही लष्करी जवान हे महूच्या इन्फंट्री स्कूलमध्ये यंग ऑफिसर्सचा कोर्स करत आहेत. हे दोन लष्करी जवान आणि त्यांच्या दोन मैत्रिणी असे चौघेजण मंगळवारी रात्री महू-मंडलेश्वर रस्त्यावरील जाम गेटजवळील अहिल्या गेटजवळ फिरण्यासाठी गेले होते. यावेळी रात्री 2.30 च्या सुमारास एक अधिकारी आणि त्याची मैत्रीण कारमध्ये असताना 6-7 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्या अधिकाऱ्याला मारहाण करत हल्लेखोरांनी बंदूकीचा धाक दाखवत सोबत असलेल्या मैत्रिणीवर अत्याचार केला.
घटनेवेळी दुसरा जवान त्यावेळी आपल्या मैत्रिणीसोबत जवळच्या टेकडीवर होता आणि किंचाळण्याचा आवाज ऐकून तो खाली आला. हल्लेखोरांनी त्यालाही बंदूक दाखवत १० लाखांच्या खंडणीची मागणी केली. या दुसऱ्या अधिकाऱ्याने तात्काळ वरिष्ठांना फोन करुन याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत आरोपी जंगलात पळून गेले होते.
दरम्यान, या चौघांनाही सकाळी 6.30 वाजता महू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले, जिथे वैद्यकीय तपासणीत महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच दोन्ही अधिकाऱ्यांच्या शरीरावर जखमांच्या खुणा आहेत, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. तक्रारदाराने आपल्यासोबत असलेल्या महिलेवर बलात्कार आणि लुटल्याचा आरोप केला आहे." बरगोंडा पोलिसांनी विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच सहा संशयितांची ओळख पटली आहे, त्यापैकी दोघांना जंगलातून ताब्यात घेण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.