Pune Dam Level : पुणेकरांचं टेन्शन मिटलं, जिल्ह्याला पाणीपुरवठा ४ धरणांत किती पाणीसाठा? जाणून घ्या A टू Z माहिती

Pune Dam Level update : पुणेकरांचं टेन्शन मिटवणारी बातमी हाती आली आहे. पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा ४ धरणांत १०० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
Pune Dam Water Level
Pune Dam Water Level TodaySaam TV
Published On

पुणे : पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या ४ धरणांत पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या धरणक्षेत्र परिसरात चांगला पाऊस पडल्याने नागरिकांची चिंता मिटली आहे. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या ४ धरणांत १०० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

पुणेकरांची चिंता मिटली

पुणे जिल्ह्याला चार धरणांतून पुरवठा केला जातो. पुणे जिल्ह्याला पाणीपुरठवा करणाऱ्यामध्ये खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या धरणाचा समावेश दिला आहे. या चारही धरणांत १०० टक्के पाणीसाठा जमा झाल्याने नागरिकांची पाणीचिंता मिटली आहे.

पुणे जिल्हा आणि धरण क्षेत्रात यंदा मुसळधार पाऊस कोसळला. यंदा चांगला पाऊस कोसळल्याने चारही धरणं १०० टक्के भरली आहेत. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणं पूर्ण भरली आहेत. खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव धरण शंभर टक्के भरल्याने नागरिकांचं टेन्शन मिटलं आहे.

भंडारा जिल्ह्यातील बपेरा पूलावर 3 ते 4 फूट पाणी

भंडारा जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. तर भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात वैनगंगा नदी काठच्या बाम्हणी गावात पुराचा पाणी गावात शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झालीये. तर शेकडो एकर शेत पाण्याखाली गेलं आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. अशीच परिस्थिती सर्वात तालुक्यात पाहायला मिळत आहे. मागील पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली होती, मात्र, दोन सुरु असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा बपेरा पूलावर 3 ते 4 फूट पाणी असल्यामुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांचा संपर्क तुटला आहे.

बीडमध्ये मांजरा धरणातील पाणीसाठा वाढला

बीडच्या केज तालुक्यातील धनेगावमध्ये मांजरा धरणात जिवंत पाणीसाठा 76.50 टक्के एवढा झाला आहे. यामुळे धरण कधीही भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरण भरण्याच्या शक्यतेमुळे मांजरा नदीकाठच्या गावातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

मांजरा धरणाची पाणी पातळी 641.35 मीटर आहे. तर धरणातील उपयुक्त पाणीसाठा 76.50 टक्के आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अशीच पर्जन्यवृष्टी राहून पाण्याचा येवा असाच राहिला तर मांजरा धरण कधीही निर्धारित पातळीस भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर धरणात येणारा येवा मांजरा धरणाचे दरवाजे उघडण्यात येऊन नदीपात्रात सोडावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com