Maharashtra Politics: महायुतीत जागांवरून मोठा तिढा! भाजपच्या 20 जागांवर अजित पवार गटाचे आमदार; शिंदे गटाने केली थेट 'इतक्या' जागांची मागणी

Mahayuti News: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि अजित पवार गटात 20 जागांवर वाद निर्माण झाला आहे.
महायुतीत जागांवरून मोठा तिढा! भाजपच्या 20 जागांवर अजित पवार गटाचे आमदार; शिंदे गटाने केली थेट 'इतक्या' जागांची मागणी
Ajit Pawar, CM Eknath Shinde, Devendra FadanvisSaam Tv
Published On

Maharashtra Assembly Election 2024 News in Marathi: जसजशा विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत. तसतसा महायुतीतला जागावाटपाचा तिढा वाढत चाललाय. सर्वात मोठा डोकेदुखीचा मुद्दा ठरलाय तो भाजपच्या जागांवर असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार. अजितदादांच्या २० आमदारांविरोधात गेल्यावेळी पराभूत झालेले भाजपचे उमेवार यंदा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

त्यांना तिकीट न दिल्यास ते बंडखोरीच्या तयारी असल्याची चर्चा आहे. त्यांमुळे भाजपसमोर एका बाजुला जागा वाटपाचं टेंशन असून दुसऱ्या बाजूला नाराजांचं मन वळवण्याचं मोठं आव्हान आहे. नेमक्या राष्ट्रवादीच्या कोणत्या जागांवरून हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे ते जाणून घेऊ....

महायुतीत जागांवरून मोठा तिढा! भाजपच्या 20 जागांवर अजित पवार गटाचे आमदार; शिंदे गटाने केली थेट 'इतक्या' जागांची मागणी
Maharashtra Politics : शिंदे गटाचा 120 जागांवर दावा, अजित पवार गटाने केली इतक्या जागांची मागणी; भाजपची भूमिका काय?

20 जागांवर भाजपला डोकेदुखी?

इंदापूर

दत्ता भरणे, आमदार, राष्ट्रवादी (AP)

हर्षवर्धन पाटील, इच्छुक

वडगाव शेरी

सुनील टिंगरे, आमदार, राष्ट्रवादी (AP)

जगदीश मुळीक, इच्छुक, भाजप

वाई

मकरंद पाटील, आमदार, राष्ट्रवादी (AP)

मदन भोसले, इच्छुक, भाजप

अकोले

किरण लहामटे, आमदार, राष्ट्रवादी (AP)

वैभव पिचड, इच्छुक, भाजप

कोपरगाव

आशुतोष काळे, आमदार, राष्ट्रवादी (AP)

विवेक कोल्हे, इच्छुक, भाजप

अमळनेर

अनिल पाटील, आमदार, राष्ट्रवादी (AP)

शिऱिष चौधरी, इच्छुक, भाजप

पुसद

इंद्रनील नाईक, आमदार, राष्ट्रवादी (AP)

नीलय नाईक, इच्छुक, भाजप

बडनेरा

रवी राणा, आमदार, भाजप समर्थक

शिवराय कुलकर्णी, इच्छुक, भाजप

अर्जुनी मोरगाव

मनोहर चंद्रिकापुरे, आमदार, राष्ट्रवादी (AP)

राजकुमार बडोले, इच्छुक, भाजप

महायुतीत जागांवरून मोठा तिढा! भाजपच्या 20 जागांवर अजित पवार गटाचे आमदार; शिंदे गटाने केली थेट 'इतक्या' जागांची मागणी
Maharashtra Politics : शिंदे गटाचा 120 जागांवर दावा, अजित पवार गटाने केली इतक्या जागांची मागणी; भाजपची भूमिका काय?

आता वाद सुरू असताना तिकडे शिंदे गटानं थेट 107 जागांवर दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा असल्यामुळे आणि लोकसभेत भाजपपेक्षा चांगलं यश मिळाल्यामुळे भाजपपेक्षा जास्त जागा शिंदे गटानं मागितल्या आहेत. एवढंच नव्हे तर शिंदे गटानं वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढती करण्याची तयारीही दाखवलीय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मात्र हा प्रस्ताव फेटाळून लावलाय.

राष्ट्रवादीसोबत २० जागांवर भाजपचा तिढा सुरू असताना अनेक ठिकाणी शिंदे गटाचे आमदार असून अजितदादांच्या राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे हे त्रांगडं भाजप कसं सोडवणार? हा तिढा सोडवताना आपल्याच पक्षातल्या नाराजांना कसं रोखून धरणार ? अशा अनेक प्रश्नांमुळे महायुतीत सर्वाधिक डोकेदुखी भाजपची वाढणार आहे. त्यामुळे महायुती एकसंधपणे निवडणुकीला सामोरं जाणार की मैत्रीपूर्ण लढतीची रणनीती आखणार याबाबत उत्सुकता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com