भरत मोहळकर, साम प्रतिनिधी
या आहेत वर्षा सरपाते,नांदेडच्या भोकर तालुक्यातील पाळज गावात राहतात. पती मोलमजूरी करतात तर वर्षा शिवणकाम करून फाटक्या संसाराला ठिगळं मारतात. त्यांना 2 मुलं आहेत. मुलांचं शिक्षण, घरातला खर्च हे सगळं सांभाळताना वर्षा यांना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने त्यांच्या फाटक्या संसाराला आधार मिळाल्याचं वर्षा सांगतात.
आपल्या संसाराला आर्थिक हातभार लावावा, म्हणून महिला प्रयत्न करत असतात..मात्र संसाराचा गाडा हाकताना त्यांना बिकट परिस्थितीतून जावं लागतं. त्यात महिलांची हेळसांड होते. मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालंय... तर योजनेच्या 3 हजार रुपयांचा खूप मोठा फायदा झालाय.मुलीच्या शिक्षण आणि दवाखान्यासाठी त्याचा उपयोग झालाय, असं म्हणताना प्रियंकांच्या डोळ्यात पाणी तरळलं.
आम्हाला ना शेत ना शिवार. मोलमजुरी करूनच आम्ही जगतो. त्यामुळे लाडकी बहीण योजनेमुळं आमच्या फाटक्या संसाराला मोठा हातभार लागलाय.त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी ही योजना चालू ठेवावी, अशी मागणी भुमिहीन शेतमजुर अनिता कदम यांनी केलीय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळं कुठं उसवलेल्या संसाराची वीण गुंफली गेलीय.तर कुठं भुमिहीन मजुरांनाही आर्थिक आधार मिळालाय. त्यामुळे कष्टाने रापलेल्या हातांसाठी ही योजना नवसंजीवनी ठरलीय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.