Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्रात 'तुतारी'चा आवाज! शरद पवारांच्या भेटीसाठी मोदी बागेत गर्दी; पडद्यामागे काय घडतंय?

Sharad Pawar Latest News: पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाची सुत्रे पुण्यातून हालत असल्याची चित्रे दिसत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यामध्ये शरद पवार यांची अनेक नेत्यांनी भेट घेतल्याने महायुतीसह इच्छुकांचीही धाकधुक वाढली आहे.
NCP Symbol Crisis: विधानसभेला चिन्हाचा घोळ नकोच! 'पिपाणी' विरोधात शरद पवार गटाची निवडणूक आयोगात धाव; पाहा VIDEO
Maharashtra Politics |Sharad Pawar NCP Saam Digital
Published On

पुणे, ता. ११ सप्टेंबर

Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून शरद पवार यांनी राजकीय डावपेच टाकायला सुरुवात केली आहे. लोकसभेतील मोठ्या विजयानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु असून महायुतीमधील अनेक बडे नेते तुतारी हाती घेण्यास इच्छुक आहेत. एकीकडे शरद पवार स्वतः महाराष्ट्रभर दौरे करत महायुतीला धक्के देत आहेत. दुसरीकडे पुण्यामध्ये शरद पवार यांच्या भेटीसाठी अनेक बडे नेते येत असून उमेदवारीसाठी जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाची सुत्रे पुण्यातून हालत असल्याची चित्रे दिसत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यामध्ये शरद पवार यांची अनेक नेत्यांनी भेट घेतल्याने महायुतीसह इच्छुकांचीही धाकधुक वाढली आहे.

NCP Symbol Crisis: विधानसभेला चिन्हाचा घोळ नकोच! 'पिपाणी' विरोधात शरद पवार गटाची निवडणूक आयोगात धाव; पाहा VIDEO
Maharashtra Politics : २० जागांवरुन भाजप-अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मतभेद, कुठे पंचाईत, कुठे घासून लढती?

शरद पवारांच्या भेटीला गर्दी..

विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने कंबर कसली आहे. एकीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रा काढली असताना स्वतः शरद पवारही मैदानात उतरले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार, पुणे बारामतीच्या दौऱ्यावर असून त्यांचे निवासस्थान असलेल्या गोविंद बाग येथे अनेक बडे नेते शरद पवारांच्या भेटीला येत आहेत.

माण- खटावमध्ये अनिल देसाई इच्छुक..

आज सकाळीच माण- खटावमधील नेते, सातारा जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी आपल्या समर्थकांसह मोठे शक्तीप्रदर्शन करत शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी माण- खटावमध्ये विधानसभेची उमेदवारी मिळावी, याबाबत चर्चाच झाल्याचे अनिल देसाई यांनी सांगितले. माण आणि खटाव मतदारसंघातील कार्यकर्ते घेऊन आलो आहे. मी उमेदवारीची मागणी केली आहे, 15 वर्ष थांबलो आहे, माणच्या उर्मट आमदारांना धडा शिकवायचा आहे. त्यामुळे मला उमेदवारी पाहिजे, असे अनिल देसाई म्हणाले.

NCP Symbol Crisis: विधानसभेला चिन्हाचा घोळ नकोच! 'पिपाणी' विरोधात शरद पवार गटाची निवडणूक आयोगात धाव; पाहा VIDEO
Kolhapur Accident: हृदयद्रावक! बोलेरो- ट्रकचा भीषण अपघात! एकाच गावातील ३ तरुण ठार; ४ जण जखमी

उमेदवारीवरुन 'मविआ'मध्ये सामना..?

तसेच या चर्चेत शरद पवार यांनी आपल्याला काही दिवसात याबाबत बसून चर्चा करु असा शब्द दिला आहे. माण- खटावमधील संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये तुमचे नाव आहे, असे सांगितल्याचे म्हणत चर्चा सकारात्मक झाली असून आपल्याला उमेदवारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, माण- खटाव तालुक्यामध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून प्रभाकर देशमुख यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून शेखर गोरेही इच्छुक आहेत. अशातच आता अनिल देसाई यांनीही या मतदार संघावर दावा केल्याने महाविकास आघाडीमध्येच उमेदवारीवरुन रणकंदन होण्याची शक्यता आहे.

पंढरपुरमधील बड्या नेत्यांची भेट..

दुसरीकडे काल पंढरपूरचे नगराध्यक्ष नागेश भोसले, आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत, काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर, माजी सभापती वसंत देशमुख,भगीरथ भालके यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकार्यांनी शरद पवारांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे. त्यानंतर आज एकेकाळचे शरद पवारांचे निष्ठावंत औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजीत पाटील यांनी शरद पवारांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे पंढरपुरात उमेदवारीचा गुंता वाढला आहे.

NCP Symbol Crisis: विधानसभेला चिन्हाचा घोळ नकोच! 'पिपाणी' विरोधात शरद पवार गटाची निवडणूक आयोगात धाव; पाहा VIDEO
Pune Crime: पुण्यात पोलिसांकडून व्यावसायिकाला दमदाटी अन् मारहाण; घटना CCTV मध्ये कैद

दरम्यान, फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून बौद्ध समाजाला उमेदवारी मिळावी या मागणीसाठी फलटणमधील बौद्ध समाजाचे कार्यकर्ते शरद पवार यांच्या भेटीला आले होते. शरद पवारांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आम्ही सगळ्या पक्षांना उमेदवारी मागतो आहोत. आता शरद पवार आम्हाला न्याय देतील असे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे .

NCP Symbol Crisis: विधानसभेला चिन्हाचा घोळ नकोच! 'पिपाणी' विरोधात शरद पवार गटाची निवडणूक आयोगात धाव; पाहा VIDEO
Maharashtra Politics: अशोक चव्हाणांना धक्का! भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसच्या वाटेवर; नांदेडमध्ये भाजपची वाट बिकट?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com