Maharashtra Politics : विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी नवरात्रोत्सवात येणार ; अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात संकेत, अजित पवारांना काय म्हणाले?

Mahayuti Seat Sharing BJP first List : विधानसभेच्या रिंगणात भाजपचे कोणते उमेदवार उतरणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पुढील काही दिवसांत हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
मोठी बातमी! विधानसभेची निवडणूक महायुतीत एकत्रित लढवणार; अजित पवार गटाला किती जागा मिळणार?
Rajya Sabha By Election 2024:Saam Tv
Published On

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अजून जाहीर झालेला नाही. त्यामुळे कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार, हे अद्याप गुलदस्त्यामध्येच आहे. नवरात्राच्या पहिल्या आठवड्यामध्ये भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जातेय. भाजप नेते १६० जागांसाठी आग्रही असल्याचं देखील समोर आलंय.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील आश्वस्त केलंय. तुम्ही आमच्यासोबत आहात. विधानसभेला देखील सोबतच राहणार आहात. महायुतीमध्ये ज्या मुद्द्यांवर एकमत होत (Vidhan Sabha Election) नाही, त्यावर उपाय करण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अजित पवार यांना दिलंय. येत्या १५ दिवसांत भाजपच्या किमान ५० उमेदवारांना कामाला लागण्याचे निरोप व्यक्तिशः दिले जाण्याची शक्यता आहे.

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला

३ ऑक्टोबरनंतर भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. अमित शाह आणि भाजप नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती मिळतेय. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यामध्ये दोन महत्त्वाच्या बैठका झाल्या (Mahayuti Seat Sharing) आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह राज्यामधील नऊ प्रमुख भाजप नेत्यांची बैठक रविवारी ८ सप्टेंबर रोजी रात्री घेतली. बंडखोरीची शक्यता असल्यामुळे उमेदवारांना थेट निरोप द्यायचा, कोणतीही चर्चा करायची नाही, असा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आलाय.

भाजपचे विद्यमान १०२ आमदार आहेत. त्यामुळे जास्त जागा भाजपलाच (BJP) मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत ५० नावं समोर येण्याची शक्यता आहे. तिन्ही पक्षांनी मिळून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा उल्लेख अमित शाहांनी केलाय. त्यामुळे इतर चर्चांना पुर्णविराम मिळालेला आहे. येत्या दहा-बारा दिवसांत जागावाटपाची चर्चा लवकर संपून महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होणार आहे.

मोठी बातमी! विधानसभेची निवडणूक महायुतीत एकत्रित लढवणार; अजित पवार गटाला किती जागा मिळणार?
BJP Leader Resigns: गोंदियात भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली पक्षाची साथ; या दिवशी करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

पक्षांतर्गत फेरबदलांवर चर्चा

मुंबई भाजपच्या कोअर कमिटीची आज दुपारी बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यानंतर होणाऱ्या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, (Maharashtra Politics) मंत्री मंगलप्रभात लोढा, अतुल भातखळकर, प्रविण दरेकर, प्रसाद लाड आणि कोअर कमिटीतील इतर सदस्य हजर राहणार असल्याची माहिती मिळतेय. या बैठकीत संघटनात्मक आढाव्यासह पक्षांतर्गत फेरबदलांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या तोंडावर खांदेपालट करण्यास नेतृत्व मान्यता देणार का ? या प्रश्नावर देखील निर्णय होण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! विधानसभेची निवडणूक महायुतीत एकत्रित लढवणार; अजित पवार गटाला किती जागा मिळणार?
Maharashtra Politics: भाजपचं 125चं मिशन, शिंदे आणि अजित पवार गटाला टेंशन? 160 जागा लढवण्याचा BJP चा आग्रह?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com