BJP Leader Resigns: गोंदियात भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली पक्षाची साथ; या दिवशी करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra Politics: माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ते लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
गोंदियात भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली पक्षाची साथ; या दिवशी करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
Devendra FadnavisSaam Tv
Published On

शुभम देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गोंदियात भाजपला मोठा धक्का बसला आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते 13 सप्टेंबरला गोंदियात वरिष्ठ काँग्रेस नेत्याच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. अशी माहिती त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत दिली.

कोण आहेत गोपाल अग्रवाल?

गोपालदास अग्रवाल हे ५ वेळा गोंदिया विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भरतीय जनता पक्षात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित प्रवेश केला.

गोंदियात भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली पक्षाची साथ; या दिवशी करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
kalyan Crime : सासरा आणि दिराकडून विवाहितेवर सामूहिक अत्याचार, नवऱ्याकडून मारहाण; कल्याणमधील धक्कादायक घटना

पुढे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर गोंदिया विधानसभेची निवडणूक लढविली होती. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. आज पत्रकार परिषदेत बोलताना गोपालदास अग्रवाल म्हणाले की, ''गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षात राहिलो. पक्ष सत्तेत सहभागी असताना सुद्धा हव्या त्या प्रमाणात गोंदिया विधानसभेचा विकास न करता आल्याने आगामी विधानसभा निवडणूक पाहता काँग्रेस पक्षात घर वापसी करत आहे.''

गोंदियात भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली पक्षाची साथ; या दिवशी करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
Manoj Jarange Patil: आरक्षण नाही, तर सुपडा साफ होणारच; जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

दरम्यान, गोपालदास अग्रवाल हे काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने गोंदिया जिल्यातील काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार सहसराम कोरोटे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनसोड आणि इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केलं. येत्या १३ सप्टेंबरला गोंदियात आयोजित काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात माजी आमदार गोपालदास अग्रवाल हे घर वापसी करणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com