Pune Crime: पुण्यात पोलिसांकडून व्यावसायिकाला दमदाटी अन् मारहाण; घटना CCTV मध्ये कैद

Pune Police: पुण्यामध्ये पोलिसांकडून व्यावसायिकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एकीकडे पुण्यात गुंडांकडून हैदोस घालता जात आहे. तर दुसरीकडे पोलिसांकडून व्यवसायिकांना दमदाटी सुरू आहे.
Pune Crime: पुण्यात पोलिसांकडून व्यावसायिकाला दमदाटी अन् मारहाण; घटना CCTV मध्ये कैद
Pune PoliceSaam Tv
Published On

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. रोज हत्या, अत्याचार, कोयता हल्ला, तोडफोड यासारख्या घटना समोर येत आहेत. गुन्हेगारांना पोलिसांचा वचक राहिला नाही असे चित्र सध्या पुण्यामध्ये आहेत. कोयता गँगमधील गुंड मात्र मोकाट फिरत आहेत. अशामध्ये पुणे पोलिसांकडून व्यावसायिकांना दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. व्यावसायिकाला मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेमुळे पोलिस आयुक्तांचे लक्ष कुठे आहे? असा सवाल विचारला जात आहे.

पुणे शहरात पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व आस्थापनांना रात्री दीड वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी आहे. निर्धारित नियमानुसार त्यांनी व्यवसाय करणे बंधनकारक आहे. मात्र असे असताना सुद्धा चतुर्श्रुंगी पोलिसांनी ज्ञानेश्वर पादुका चौकातील 'द खालसा जंक्शन' या हॉटेलमध्ये घुसून तेथील व्यावसायिकाला रात्री साडे अकरा वाजता दमदाटी केली. तसेच त्याला गाडीमध्ये डांबून एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे फिरवत पोलिस ठाण्यात घेऊन गेले.

तर दुसरीकडे चतुर्शिंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाणेर बालेवाडी या भागात खुलेआम टपऱ्या चायनीजचे गाडे सुरू असल्याचे दिसून येते. एकीकडे प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना जर पोलिस अशा प्रकारची वागणूक देत असतील तर हा नक्कीच गंभीर प्रकार आहे. मागील दोन दिवसांपूर्वी देखील या पोलिसांनी अशाच प्रकारे बाणेर परिसरातील एका हॉटेलमध्ये तोडफोड केली. तोडफोडीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता. त्याचा सुगावा या पोलिसांना लागला त्यांनी या हॉटेलमधील डीव्हीआरच गायब केला.

Pune Crime: पुण्यात पोलिसांकडून व्यावसायिकाला दमदाटी अन् मारहाण; घटना CCTV मध्ये कैद
Pune Breaking : पुण्यात उद्यापासून संध्याकाळी ५ नंतर हे प्रमुख रस्ते बंद, गणेशोत्सवात वाहतूक कोंडी फुटणार!

विशिष्ट हेतू ठेवून जर अशाप्रकारे कारवाई केली जात असेल तर हे नक्कीच विचार करण्यास भाग पाडणारी गोष्ट आहे. एकीकडे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. खूनाचे सत्र काही केल्याने थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाही. त्यात पुण्यामध्ये टोळी युद्धाचा भडका सुरू आहे. सराईत गुन्हेगारांकडून वारंवार गुन्हे केले जात आहेत. रस्त्यावरती पोलिसांची कमी मात्र त्यांचीच दहशत जास्त आहे. मात्र पोलिस व्यवसायिकांवर ही मुर्दमकी गाजवत आहेत.

Pune Crime: पुण्यात पोलिसांकडून व्यावसायिकाला दमदाटी अन् मारहाण; घटना CCTV मध्ये कैद
Mumbai-Pune Distance: मुंबई-पुणे रेल्वे प्रवास सुसाट होणार, प्रवाशांचा एक तास वाचणार; कसं ते पाहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com