सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अनेक धक्कादायक घटना पाहायला मिळतात. कधी घरफोडीच्या असतात तर कधी चोरीच्या घटना सीसीटीव्हीमध्ये कैद होतात. सध्या अशीच एक धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिथे काही चोरांना चांगलीच अद्दल घडलेली आहे.
व्हायरल होत असलेली घटना पंजाब (Panjab) येथील जालंधरमध्ये घडलेली आहे. जिथे फक्त एक मोबाईल चोरीच्या पायी तरुणीला भररस्त्यातून धावत्या बाईकच्या पाठी घासत नेले आहे. त्यानंतर ही घटना सर्वत्र व्हायरल झाली. मात्र तात्काळ या घटनेवर जालंधर पोलिसांना कारवाई केली असून त्या चोरांना अटक करण्यात आलेली आहे. मात्र मुलीच्या मोबाईल (Mobile) चोरीचा प्रत्यय करणाऱ्या चोरांनाच आता मदतीची गरज आहे कारण पोलिसांनी तरुणीचा व्हिडिओ पाहून तिची झालेली अवस्था पाहिली मात्र त्यावर पोलिसांनी त्या चोरांची जोरदार अशी धुलाई केली की, त्यांना पायांना प्लास्टर लावण्याची वेळ आलेली आहे.
व्हायरल व्हिडिओ (Video) एक परिसर दिसून येत आहे. या परिसरात कोणताही व्यक्ती दिसून येत नाही. मात्र काही वेळातच तेथून एका तरुण बाईकवरुन जाताना दिसून येत आहेत मात्र व्हिडिओत त्यांना नीट पाहिले तर दिसून येईल की, बाईकवरुन जाणारे तिघही आरोपी आहेत एका तरुणीला धावत्या बाईकसोबत रस्यावरुन घासत घेऊन जाताना दिसत आहेत. यांच्या पाठी एक व्यक्ती त्यांना पकडण्यासाठी धावताना दिसत येत आहे. संपूर्ण घटना परिसरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झालेली आहे. मात्र या घटनेत तरुणीला गंभीर दुखापत झालेली आहे.
व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओ ''@CPJalandhar'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताच व्हिडिओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज आणि लाईक्स मिळालेले आहेत. व्हिडिओ पाहून प्रत्येक नेटकऱ्यांनी पोलिसांचे कौतुक (Curiosity) केलेले आहेत तर अनेकांनी या घटनेबद्दल संतापजनक प्रतिक्रियाही कमेंट्सबॉक्समध्ये दिलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.