Screen Time rules for kids : आता मुलांना टीव्ही, मोबाईल पाहता येणार नाही, कुणी घातली बंदी? लहान मुलांसाठी काय आहेत नियम? पाहा व्हिडिओ

Screen Time rules for kids news : मुलांना आता टीव्ही, मोबाईल पाहता येणार नाही. मोबाईल, टीव्ही पाहण्यास बंदी आता सरकारने टाकलीय. तर 18 वर्षापर्यंतच्या मुलांना टीव्ही, मोबाईल पाहण्यासाठी निर्बंध आणण्यात आलेयत. कुणी घातलीय मुलांना मोबाईल, टीव्ही पाहण्यावर बंदी. पाहुयात हा रिपोर्ट..
आता मुलांना टीव्ही, मोबाईल पाहता येणार नाही, कुणी घातली बंदी? लहान मुलांसाठी काय आहेत नियम? पाहा व्हिडिओ
Parenting TipsSaam Tv
Published On

मुंबई : मुलांना आता मोबाईल आणि टीव्ही बघता येणार नाही हे ऐकून तुम्हाला धक्काच बसला असेल. मात्र, हे खरं आहे. 2 वर्षांपर्यंतच्या सर्वच मुलांना स्मार्टफोन, टीव्ही पाहण्यावर बंदी घालण्यात आलीय. ही बंदी भारतात नाही तर स्वीडनमध्ये घालण्यात आलीय. स्वीडनच्या आरोग्यमंत्र्यांनी 18 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी स्क्रीन पाहण्यासाठी एक वेळ ठरवलीय. दोन वर्षांखालील मुलांना डिजिटल मीडिया आणि टेलिव्हिजनपासून पूर्णपणे दूर ठेवण्याचे आदेश दिलेयत. तर 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांनी स्मार्टफोन आणि टीव्ही किती पाहावा यासाठी नियम घालून दिले आहेत.

स्वीडन सरकारचे मोबाईल पाहण्याचे नियम

2 वर्षापर्यंतच्या मुलांना मोबाईल, टीव्ही पाहण्यावर बंदी

2 ते 5 वर्षांची मुलं एक तास स्क्रीन पाहू शकतात

6 ते 12 वर्षांची मुलं स्क्रीनसमोर दोन तासांपेक्षा जास्त वेळ नको

13 ते 18 वयोगटातील मुलांसाठी रोज दोन ते तीन तासचं स्क्रीन टाईम असावा

मुलांनी झोपण्यापूर्वी स्क्रीनचा वापर करू नये

पालकांनी रात्रीच्या वेळी मुलांच्या बेडरूममध्ये फोन ठेवू नये

आता मुलांना टीव्ही, मोबाईल पाहता येणार नाही, कुणी घातली बंदी? लहान मुलांसाठी काय आहेत नियम? पाहा व्हिडिओ
How To Make Milk Tasty For Kids : लहान मुलं दूध पिण्यास नाक मुरडतात; 'या' टिप्सने मिनिटांत ग्लास करतील रिकामं

मुलं टीव्ही, मोबाईलचा अतिवापर करत असल्याने त्यांना गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे स्वीडनच्या आरोग्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. मात्र, हे नियम का बनवलेयत. त्याची काय कारणं आहेत तेही पाहुयात.

मोबाईल, टीव्ही पाहण्याचे परिणाम काय?

मोबाईल, टीव्ही स्क्रीनच्या अतिवापरामुळे झोप पूर्ण होत नाही

स्क्रीन जास्तवेळ पाहिल्यामुळे नजर कमी होते

नैराश्य येतं, बसून बसून लठ्ठपणा येतो.

आता मुलांना टीव्ही, मोबाईल पाहता येणार नाही, कुणी घातली बंदी? लहान मुलांसाठी काय आहेत नियम? पाहा व्हिडिओ
Kid Exercise: मुलांना उठाबशा काढायला लावण शिक्षा नाही; तर याचे आहेत अनेक फायदे

टीव्ही, फोनमुळे मुलांची पुरेशी झोप होत नसल्याने त्यांना बालपणही नीट जगता येत नाही. त्यामुळे स्वीडनच्या आरोग्यमंत्र्यांनी मुलांना फोन, टीव्हीपासून दूर ठेवण्यासाठी नियम बनवलेयत. मात्र, असे नियम भारतातही बनवण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com