Tasty Milk For Kids
How To Make Milk Tasty For KidsSaam TV

How To Make Milk Tasty For Kids : लहान मुलं दूध पिण्यास नाक मुरडतात; 'या' टिप्सने मिनिटांत ग्लास करतील रिकामं

Tasty Milk For Kids: अनेक मुलांना दुधाची चव अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते सतत दूध पिण्यास नकार देतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याने मुलं मिनिटांत दूध संपवतील.
Published on

दुधामध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमीन आणि मिनरल्स असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आहारात दुधाचा समावेश केला पाहिजे. दूध लहान मुलांच्या आरोग्यासाठी सुद्धा फार महत्वाचे असते. दुधातील व्हिटॅमीन्सने हाडे मजबूत होतात. तसेच लहान मुलांच्या बुद्धीला देखील चालना मिळते. आता तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना दूध पिण्यासाठी देत असाल मात्र अनेक मुलांना दुधाची चव अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते सतत दूध पिण्यास नकार देतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याने मुलं मिनिटांत दूध संपवतील.

Tasty Milk For Kids
Milk Adulteration: अहमदनगरमधील भेसळयुक्त दूध केंद्रावर कारवाई; १३ हजार लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

बदाम मिल्क

मुलांना प्लेन किंवा सतत तेच तेच खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे पोटात भूक असली तरी ते असे पदार्थ खाण्याचा कंटाळा करतात. तुमची मुलं सुद्धा असं करत असतील तर दुधात बदाम आणि केसर मिक्स करा. त्याने दुधाला पिवळसर रंग येतो. आता असं दूध चिमुकल्या मुलांना फार आवडतं. बदाम आणि केसरची पेस्ट असल्याने चिमुकल्यांना जास्त चावण्याचे कष्टही घ्यावे लागत नाहीत.

ड्राय फ्रूट्स मिल्क

आरोग्य सुधारण्यासाठी आणि मुलांनी आवडीने दूध प्यावे यासाठी दुधामध्ये ड्राय फ्रूट्स मिक्स करा. त्यासाठी आधी एका भांड्यात ड्राय फ्रूट्स घ्या. हे ड्राय फ्रूट्स तुपात भाजून घ्या. पुढे एका मिक्सरमध्ये सर्व काजू, बदाम, अक्रोड, चारोळे यांची बारीक पूड करून घ्या आणि दूधात मिक्स करून मुलांना पिण्यासाठी द्या.

चॉकलेट मिल्क

लहान मुलांना चॉकलेट द्याल तितकं कमी आहे. त्यांना सतत कितीही चॉकलेट्स दिले तरी त्याला ते नाही म्हणत नाहीत. मात्र दूध पिण्यासाठी देताच नाक तोंड मुरडतात. त्यामुळे मुलांनी दूध प्यावे यासाठी दुधात चॉकलेट सिरप किंवा मग चॉकलेट्सचे तुकडे तुम्ही मिक्स करू शकता.

फ्लेवर मिल्क

तुम्ही दुधाची टेस्ट आणखी वाढण्यासाठी दुधामध्ये विविध फ्लेवर मिक्स करू शकता. त्यासाठी हनी, अॅपल, स्टॉबेरी, बासुंदी असे अनेक फ्लेवर बाजारात मिळतात. या फ्लेवर्सने दुधाला मस्त चव येते आणि दूध टेस्टी लागते. असे दूध पिण्यास मुलं नाक देखील मुरडत नाहीत.

Tasty Milk For Kids
Milk Side Effects on Children : जास्त प्रमाणात दूध पिणे चिमुकल्यांच्या आरोग्यासाठी घातक; हा गंभीर आजार होण्याची शक्यता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com