Milk Side Effects
Milk Side Effects on ChildrenSaam TV

Milk Side Effects on Children : जास्त प्रमाणात दूध पिणे चिमुकल्यांच्या आरोग्यासाठी घातक; हा गंभीर आजार होण्याची शक्यता

Milk Side Effects : दूधामध्ये कॅल्शिअम असते, तसेच व्हिटॅमीन आणि मिनल्स सुद्धा असतात. मात्र चिमुकल्यांच्या आहारात या पदार्थांसह अन्य पदार्थ देखील असणे गरजेचं आहे.
Published on

लहान मुलांचं आरोग्य सुदृढ आणि निरोगी रहावं यासाठी त्यांना पोषक आणि सकस आहार देणे गरजेचे असते. काही व्यक्ती आपल्या मुलांना फक्त दूध पाजतात. मात्र फक्त दूध पिणे लहान मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. दूधामध्ये कॅल्शिअम असते, तसेच व्हिटॅमीन आणि मिनल्स सुद्धा असतात. मात्र चिमुकल्यांच्या आहारात या पदार्थांसह अन्य पदार्थ देखील असणे गरजेचं आहे.

Milk Side Effects
Milk Adulteration: दुध भेसळखोरांविरोधात होणार कठोर कारवाई, राज्य सरकार करणार स्वतंत्र कायदा

फक्त दूध जास्त प्रमाणात प्यायल्याने होऊ शकतो गंभीर आजार

जी लहान मुलं आहारात फक्त दुधाचे सेवन करतात त्यांना काही वर्षांनी मिल्क एनीमिया आजाराचा सामना करावा लागू शकतो. जेव्हा लहान मुलं अन्य पदार्थ खात नाहीत फक्त दूध पित असतात, तेव्हा त्यांच्या शरीरातील आयर्न कमी होतं. दूधात असलेले प्रोटीन आयर्न एब्जॉबर्स ब्लॉक सुद्धा करतात. यामुळे मुलांच्या आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात त्याची माहिती जाणून घेऊ.

बध्दकोष्ठता

लहान मुलांना सतत दूध प्यायल्याने पोटाच्या समस्या होऊ शकतात. सतत दूध प्यायल्याने लहान मुलांना बध्दकोष्ठता होते. त्यामुळे या त्रासापासून दूर राहण्यासाठी लहान मुलांना सहा महिन्यांनंतर हलके फुलके पदार्थ खाऊ घाला. त्याने त्यांची पचन संस्था व्यवस्थित राहते.

उन्हाळे लागणे

लहान मुलांना दुधासह विविध पदार्थ खाऊ घालत असताना त्यांना पुरेसे पाणी सुद्धा पाजा. पाणी न पिल्याने लहान मुलांना पोटाचा त्रास आणखी वाढतो. जेवण पचण्यासाठी पाणी गरजेचं आहे. काही मुलं पाणी जास्त पित नाहीत. त्यामुळे त्यांना उन्हाळे सुद्धा लागण्याची शक्यता असते.

भूक कमी होणे

जी मुलं फक्त दुधाचे सेवन करतात त्यांना मिल्क एनीमिया होतो. त्यामुळे या आजाराने पुढे बाळाची भूक हळूहळू कमी होत जाते. कोणताही पदार्थ त्याला खावासा वाटत नाही. भूक कमी झाल्याने बाळाला अशक्तपणा सुद्धा जाणवतो.

लहान मुलांनी किती दूध प्यावे

एक ते दोन वर्षांच्या मुलासाठी तीन कप ते दोन कप दूध.

दोन वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलांसाठी दिवसभरात फक्त दोन ते अडीच कप दूध.

नऊ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलांना दिवसातून फक्त १ कप दूध द्यावे.

Milk Side Effects
Milk Adulteration: अहमदनगरमधील भेसळयुक्त दूध केंद्रावर कारवाई; १३ हजार लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com