Ahmednagar News : अहमदनगरमधील ११ दूध संकलन केंद्रावर छापेमारी; तब्बल १३ हजार ८०० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

Ahmednagar Milk Adulteration News : अहमदनगर जिल्ह्यातील 11 दूध संकलन केंद्रावर भेसळयुक्त दूध समितीने अचानक छापेमारी केली. या छापेमारीत तब्बल 4 लाख 14 हजार रुपये किमतीचे 13 हजार 800 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले.
अहमदनगरमधील ११ दूध संकलन केंद्रावर छापेमारी; तब्बल १३ हजार ८०० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट
Ahmednagar Milk Adulteration NewsSaam TV
Published On

सचिन बनसोडे, साम टीव्ही

अहमदनगर जिल्ह्यातील 11 दूध संकलन केंद्रावर भेसळयुक्त दूध समितीने अचानक छापेमारी केली. या छापेमारीत तब्बल 4 लाख 14 हजार रुपये किमतीचे 13 हजार 800 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले. दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनंतर शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे दूध भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

अहमदनगरमधील ११ दूध संकलन केंद्रावर छापेमारी; तब्बल १३ हजार ८०० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट
Shirdi News : साईबाबांच्या शिर्डीत कोयता गँगचा धुमाकूळ; मध्यरात्रीच्या सुमारास तरुणाला लुटले, धक्कादायक VIDEO

दुध भेसळ समिती, अहमदनगर यांनी केलेल्या कारवाया

दिनांक २८.०७.२०२४ - जगदंबा दुध संकलन केंद्र, शिलेगाव, तालुका राहुरी १ गाय दुध अन्न नमुना घेण्यांत आला. २. जगदंबा माता दुध संकलन केंद्र, शिलेगाव, ता. राहुरी १ गाय दुध अन्न नमुना घेण्यांत आला. ३. पतंजली दुध संकलन केंद्र, शिलेगाव, ता. राहुरी पाहणी करण्यात आली.

दिनांक ०१.०८.२०२४ - साई अमृत दुध संकलन केंद्र, ता. कोपरगाव १ गाय दुध अन्न नमुना घेण्यांत आला. २ नारायण गिरी दुध संकलन केंद्र, धोंडेवाडी, ता. कोपरगाव १ गाय दुध अन्न नमुना घेण्यांत आला. ३. प्रशांत भागवत शिंदे यांचा गोठा, मोठेबाबा मंदीराजवळ, जवळके, ता. कोपरगाव १ गाय दुध अन्न नमुना घेण्यात आला.

दिनांक ०४.०८.२०२४ - कृष्णाई दुध शितकरण केंद्र, ता. कर्जत १ गाय दुध अन्न नमुना घेण्यांत आला व १२०० लिटर दुध नष्ट करण्यांत आले. नष्ट दुधाची किंमत अंदाजे ३३०००/- रुपये इतकी आहे. २. जगदंबा दुध संकलन व शितकरण केंद्र, ता. १ गाय दुध अन्न नमुना घेण्यांत आला. ३. साईबाबा दुध संकलन केंद्र, दुरगाव, ता. कर्जत १ गाय दुध अन्न नमुना घेण्यांत आला.

४. अन्वेषा दुध संकलन केंद्र, दुरगाव, ता. कर्जत १ गाय दुध अन्न नमुना घेण्यांत आला. ५ . श्री गजानन महाराज मिल्क अॅण्ड मिल्क प्रोडक्टस, मिरजगाव, ता. कर्जत १ गाय दुध अन्न नमुना घेण्यांत आला व ४२०० ली. दुध नष्ट करण्यांत आले. नष्ट दुधाची किंमत अंदाजे १३६०००/- ६. ञिमुर्ती दुध संकलन केंद्र, मिरजगाव, ता. कर्जत पाहणी.

७. त्रिमुर्ती दुध संकलन केंद्र, राशीन रोड, कुळधरण, ता. कर्जत- १ गाय दुध अन्न नमुना घेण्यांत आला. ८. सदगुरू मिल्क अॅण्ड मिल्क प्रोडक्टस, ता. कर्जत- १ गाय दुध अन्न नमुना घेण्यांत आला. ९. नागराबाई यादव दुध संकलन केंद्र, बहिरोबावाडी, ता. कर्जत १ गाय दुध अन्न नमुना घेण्यांत आला.

१०. अॅग्रोवन मिल्क प्रोडक्टस, मिरजगाव, ता. कर्जत-१ गाय दुध अन्न नमुना घेण्यांत आला व ४६०० ली. दुध नष्ट करण्यांत आले. नष्ट दुधाची किंमत अंदाजे १३८०००/- ११. भगवान कृपा दुध संकलन केंद्र, खर्डा, ता. जामखेड १ गाय दुध अन्न नमुना घेण्यांत आला व ३८०० ली. दुध नष्ट करण्यांत आले. नष्ट दुधाची किंमत अंदाजे ११४००० इतकी होती.

अहमदनगरमधील ११ दूध संकलन केंद्रावर छापेमारी; तब्बल १३ हजार ८०० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट
Pune News : आमचा भाई गेला, आता कोणालाही सोडणार नाही; हत्यारे भिरकावत पुण्यात गुंडांचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com