Viral Story: फ्रीजमध्ये कापलेला कांदा, कणिक ठेवल्यामुळे होतात गंभीर आजार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Viral Story: आता बातमी आहे व्हायरल मेसेजची. तुम्ही फ्रीजमध्ये मळलेलं कणिक ठेवता का...? कापलेला कांदा, लसूण, आलं फ्रीजमध्ये ठेवत असाल तर तुम्ही आजारी पडाल. हे आम्ही म्हणत नाहीये तर असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली...मग काय सत्य समोर आलं पाहुयात.
Viral Story: फ्रीजमध्ये कापलेला कांदा, कणिक ठेवल्यामुळे होतात गंभीर आजार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?
Viral Story
Published On

आलं, सोललेलं लसूण ठेवत असाल तर तुम्ही आजारी पडाल.होय, असा दावा करण्यात आलाय...फ्रीजमध्ये ठेवलेल्या कांद्यामुळे विषारी गॅस तयार होतो आणि तो खाल्ल्यास गंभीर आजार होऊ शकतात असा दावा केल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण झालीय...खरंच कांदा, कणिक फ्रीजमध्ये ठेवल्याने आरोग्यास हानिकारक आहे का.? याची पडताळणी आम्ही सुरू केली...मात्र, त्याआधी व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

फ्रीजमध्ये कापलेला कांदा, मळलेलं कणिक, आलं लसून ठेवत असाल तर गंभीर आजारांनी त्रस्त व्हाल. मळलेलं कणिक दुसऱ्यादिवशी खाल्ल्याने पोटांचे विकार होऊ शकतात. हा मेसेज व्हायरल होतोय. अनेक गृहिणी फ्रीजमध्ये मळलेलं कणिक ठेवतात, कापलेला कांदा, आलं, सोललेलं लसूण फ्रीजमध्ये ठेवतात. त्यामुळे हा दावा खरा आहे का? हा आरोग्याचा प्रश्न असल्याने आमच्या टीमनं तातडीने तज्ज्ञांशी संपर्क साधला.त्यांना व्हायरल होत असलेला मेसेज दाखवला आणि यामागचं सत्य काय आहे हे जाणून घेतलं.

Viral Story: फ्रीजमध्ये कापलेला कांदा, कणिक ठेवल्यामुळे होतात गंभीर आजार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?
Jwariche Ambil Recipe : गौराईचे फेवरेट ज्वारीचे आंबील; घरच्याघरी बनवा सिंपल नैवेद्य रेसिपी

व्हायरल सत्य

साम इन्व्हिस्टिगेशमध्ये काय सत्य समोर आलं पाहुयात.

फ्रीजमध्ये मळलेली कणिक, कापलेला कांदा ठेवू नका

कांद्यामुळे अमोनिया बाहेर पडत असतो त्याचा विषारी गॅसमध्ये रुपांतर होतं

फ्रीजमध्ये कणिक ठेवल्याने शरीरात चुकीचं संप्रेरकं तयार होऊन पाचकस्त्राव उतरतात

आलं, सोललेलं लसून फ्रीजमध्ये ठेवलं तर बुरशी येऊन ती शरीरात गेल्यास त्रास होऊ शकतो

पोटाशी संबंधित समस्या वाढून गंभीर आजार होतात

फ्रीजमध्ये काहीही ठेवलं तर झाकण ठेवायला विसरू नका

फ्रीजमधलं वातावरण थंड असतं. फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणिकमध्ये बॅक्टेरिया आणि बुरशी वाढू शकतात...ज्यामुळे अन्नातून विषबाधा होते. पोटदुखी, उलट्या आणि जुलाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात....पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. ऍसिडिटी यासारख्या समस्या उद्भवू शकतात ज्यामुळे आतड्यांमध्ये जळजळ होते...त्यामुळे आमच्या पडताळणीत मळलेलं कणिक, कापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवून खाल्ल्यास गंभीर आजार होतात हा दावा सत्य ठरला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com