Mahesh Shinde News : तेराव्याला असे अनेक कावळे फिरतात, शरद पवारांच्या दौऱ्यावरुन शिवसेना आमदाराची टीका

Satara News : शरद पवार यांनी साताऱ्यातील दौऱ्यात जिहे कटापुर योजनेवर भाष्य करत मी या योजनेबाबत तीन महिन्यांनी बोलेन असं सांगितलं होतं. यात महाविकास आघाडीचे सरकार येण्याचे संकेत दिले होते. यावर महेश शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर टिका केली
Satara News
Satara NewsSaam tv
Published On

सातारा : शरद पवार हे सातारा दौऱ्यावर असून कोरेगाव मधील वाढत्या दौऱ्यावर आमदार महेश शिंदे यांनी जोरदार टिका करत निशाणा साधला आहे. त्यांनी आक्रमक शैलित निशाना साधत दहाव्याच्या आणि तेराव्याच्या कार्यक्रमाला पण खुप कावळे फिरतात. मिळेल तो प्रसाद उचलतात आणि निघुन जातात असा टोला देखील महेश शिंदे यांनी लगावला आहे. 

शरद पवार (Sharad Pawar) यांनी साताऱ्यातील दौऱ्यात जिहे कटापुर योजनेवर भाष्य करत मी या योजनेबाबत तीन महिन्यांनी बोलेन असं सांगितलं होतं. यात महाविकास आघाडीचे सरकार येण्याचे संकेत दिले होते. यावर महेश शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर टिका केली असुन लोकसभा निवडणुकीत या आधी सुद्धा शरद पवारांनी इंडीयाचं सरकार येण्याबाबत भाष्य केलं होतं. मात्र त्यांनी काहीही सांगितलं, तरी जिहे कटापुर योजना दिड वर्षापुर्वीच पुर्ण होवुन पाणी सर्वत्र गेलं आहे. आता विस्तारी जिहे कटापुर योजना करायची आहे. या योजनेच्या पुर्ण नावाचा उल्लेख शरद पवार यांनी टाळला असुन नरेंद्र मोदी यांचे गुरु लक्षमणराव इनामदार उपसा सिंचन जिहे कटापुर योजना हे नाव दिलं आहे. याला केंद्र सरकारने पंतप्रधान सिंचाई योजनेत याचा समावेश केला आहे. हे शरद पवारांना माहित नाही ही दुर्दैवाची गोष्ठ आहे; अशी टिका आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी केली आहे  

Satara News
Buldhana News : अतिसारमुळे ३ जणांनी जीव गमावला, प्रशासनाची मदत मिळेना, ग्रामसेवकही गैरहजर; 'गोमाल'च्या सरपंचाचा राजीनामा

उमेदवाराचाच अभ्यास नाही ते नेत्याला काय समजावणार 

खटाव माणच्या दुष्काळाचं फक्त राजकारणच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं केले आहे. ही योजना राज्य सरकारच्या हातात नाही, तर केंद्राकडे आहे; हे पवारांना माहित नसावं. मुळात स्थानिक उमेदवाराला याचा आभ्यास नाही, त्यामुळे ते नेत्याला काय समजावुन सांगणार असा खरमरित टोला देखील आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांना लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com