Buldhana News : अतिसारमुळे ३ जणांनी जीव गमावला, प्रशासनाची मदत मिळेना, ग्रामसेवकही गैरहजर; 'गोमाल'च्या सरपंचाचा राजीनामा

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील गोमाल या गावात गेल्या दहा दिवसापासून अतिसाराच्या साथीने तीन आदिवासींचा मृत्यू झाला
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

बुलढाणा : आदिवासी गावातील नागरिक हे जलजन्य आजाराने व अतिसाराने मृत्यू पावत आहे. गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. अतिसाराच्या रुग्णांना दहा किलोमीटर झोळीत घालून न्यावे लागत आहे. मात्र प्रशासन अद्यापही मदत करत नसल्याने उद्विग्न होऊन सरपंचाने राजीनामा दिला आहे.

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील गोमाल या गावात गेल्या दहा दिवसापासून अतिसाराच्या साथीने तीन आदिवासींचा मृत्यू झाला आहे. तर अद्यापही गोमाल या गावात परिस्थिती नियंत्रणात नसल्याची ग्राउंड रियालिटी 'साम टीव्ही'च्या ग्राउंड रिपोर्टमध्ये समोर आली आहे. अजूनही आदिवासी बांधवांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. (Health Department) आरोग्य प्रशासनाने वैद्यकीय पथक गावात पाठवले आहे. मात्र अद्यापही अनेक लहान मुलांना व महिलांना अतिसाराची लागण झाली आहे. आजही गावातील ६८ रुग्णावर उपचार सुरू आहेत. 

Buldhana News
Nashik Crime : फर्निचर मॉलवर धाडसी दरोडा; सुरक्षारक्षकाला डांबून ठेवत तांब्या पितळाच्या भांड्यांसह लाखोंचा ऐवज लांबविला

राजीनामा देण्यापूर्वी काय म्हणाले सरपंच 

अतीसराराची लागण झालेल्या गोमाल गावाचे सरपंच गुमानसिंह मुजलदा म्हणतात, गावात ग्रामसेवक पावसाळा सुरू झाल्यापासून आलाच नाही. या भागाचे आमदार, खासदार देखील गावात आले नाही. गावात येण्यासाठी रस्ता नाही, पिण्याची पाण्याची सुविधा नाही, मी पंचायत समितीसह विविध ठिकाणी अनेक चकरा मारल्या, परंतु उपयोग होत नाही. आम्ही विहिरीचं पाणी पितो. गावातील तीन जणींचा मृत्यू झालाय, दोन दिवसापासून डॉकटर आले; पण रुग्णाची परिस्थिती जैसे थे आहे. म्हणून मी राजीनामा दिला असल्याचे गुमानसिंह मुजलदा यांनी सांगितले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com