Chhatrapati Shivaji Maharaj Temple Ayodhya Ram Mandir Connection Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Shivaji Maharaj Temple : महाराष्ट्रातील पहिल्या शिव मंदिराचे अयोध्या कनेक्शन, नेमकं कसं आहे हे मंदिर?

Shivaji Maharaj Temple : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज महाराष्ट्रातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या मंदिराचे अयोद्धेतल्या राम मंदिराशी काय कनेक्शन आहे, वाचा..

Yash Shirke

भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथे महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराज मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण विधी यांसह अनेक विधी पार पडले. गडकिल्ल्यासारखी रचना असलेले हे मंदिर दर्शनस्थळ नसून शक्तिपीठ म्हणून उभारण्यात आले आहे.

या मंदिराला दीड एकर जागेमध्ये तटबंदी आणि ४२ फूट उंच प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या तटबंदीवर ३६ चबुऱ्यांवर शिवरायांच्या जीवनातील प्रसंगांचे देखावे साकारण्यात आले आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात ६ फूट उंच कृष्णशिला सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाची मूर्ती ज्या मूर्तिकाराने साकारली आहे, त्यांनीच शिवाजी महाराज मंदिरातील मूर्ती देखील साकारली आहे.

भिवंडीतील हे मंदिर शिवप्रेमींसाठी तीर्थस्थळ बनणार असल्याचे म्हटले जात आहे. शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजूभाऊ चौधरी यांच्या संकल्पनेतून हे मंदिर उभारण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय किर्तीचे मूर्तिकार अरुण योगीराज यांनी अखंड कृष्णशिला या दगडातून छत्रपती शिवाजी महाराज यांची सहा फूट उंचीची मूर्ती बनवली आहे. ही पहिलीच मूर्ती चार वर्षांपूर्वी बनवण्यासाठी दिली होती. पण रामलल्ला यांच्या मूर्तीच्या कामामुळे यामध्ये खंड पडला होता.

छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती बनवताना अरुण योगीराज यांनी विविध पैलूंचा अभ्यास केल्याचे शिवक्रांती प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी म्हटले आहे. महाराजांच्या जीवनावरील शौर्याचे प्रसंग, त्यांचा इतिहास समाजाला कळावा यासाठी मंदिराच्या तटबंदी खालील जागेत ३६ शिल्पचित्र बनवण्यात आली आहेत. त्याची माहिती मराठी आणि इंग्रजी भाषेत देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT