Sambhajinagar Accident Saam Tv
महाराष्ट्र

Accident: नवरात्रोत्सवाला गालबोट! तुळजाभवानीची ज्योत घेऊन येताना भाविकांवर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू

Sambhajinagar Accident: संभाजीनगरमध्ये भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. हे सर्व भाविक तुळजापूरवरून देवीची ज्योत घेऊन येत असताना ही घटना घडली.

Priya More
  • नवरात्रोत्सवासाठी तुळजाभवानीची ज्योत आणताना भाविकांवर काळाचा घाला

  • संभाजीनगरच्या कचनेर फाट्याजवळ टेम्पोची दुचाकीला धडक

  • धुळे-सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला

  • या अपघातामध्ये तीन भाविकांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला

माधव सावरगावे, संभाजीनगर

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी भयंकर घटना घडली. तुळजाभवानी देवीची ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. भरधाव टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर ज्योत घेऊन जाणारा तरुण गंभीर जखमी झाला. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कचनेर फाट्याजवळ हा अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे, टेम्पो चालकाने दुचाकी २ किलोमीटरपर्यंत फरफटत नेली. संभाजीनगर पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूर येथून आई तुळजाभवानीची ज्योत घेऊन आपल्या गावी परतणाऱ्या भाविकांसोबत भयंकर घडलं. देवीची ज्योत घेऊन येत असातना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कचनेर फाट्याजवळ टेम्पोने दुचाकीला चिरडलं. या अपघातामध्ये ३ तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुण गंभीर जखमी झाला. संभाजीनगर जिल्ह्यातील गोळेगाव गदाना या गावातील हे भाविक होते. गाव अवघ्या ४० ते ५० किलोमीटर अंतरावर राहिले होते त्याआधीच या भाविकांवर काळाने घाला घातला. तरुणांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी सांगितले की, शनिवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात अक्षय बिजलसिंग राजपूत (वय २८ वर्षे, अमोल अशोक औटे (वय ३२ वर्षे) आणि गोरख रावसाहेब म्हसकर (वय २८ वर्षे) या तरुणांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. देवीची ज्योत घेऊन जाणारा शुभम आधाने (वय २० वर्षे) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर दुचाकी आयशरला अडकून २ किलोमीटरपर्यंत फरफटत गेली.

या अपघातानंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. त्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. स्थानिकांनी पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : नवरात्री सुरू झाली, लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹1500 कधी येणार? महत्वाची अपडेट आली समोर

Bigg Boss 20 : सलमान खानने सदस्यांना दिला मोठा धक्का, बिग बॉसच्या घरात पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची धमाकेदार एन्ट्री

Maharashtra News Live Update: नवरात्र उत्सवानिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये घटस्थापनेला सुरुवात

Heart-Mobile : शर्टच्या खिशात फोन ठेवताय? सावधान! हृदयाचा धोका वेळीच ओळखा, नाहीतर...

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT