Famous Actor Arrested: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात

Famous Actor Arrested: अभिनेता इम्रान खानला आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी अटक केल्याची चर्चा आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत अभिनेता आंदोलनात सहभागी झाला होता.
Mumbai Police have detained famous Bollywood actor Imran Khan
Mumbai Police have detained famous Bollywood actor Imran KhanSaam Tv
Published On: 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरात आंदोलन सुरू आहे. दिपके, रंका आणि दास यांना अटक केल्यानंतर जेन-झीने संताप व्यक्त करत दिल्लीसह मुंबईतही आंदोलन करण्यास उतरले. यावेळी मुंबई पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांना पोलिस व्हेनमध्ये भरत पुढील कारवाई केली. यावेळी बॉलिवूड अभिनेता इम्रान खानला देखील मुंबई पोलिसांनी ताब्यात घेत पोलिस व्हॅनमध्ये भरले. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. .

मुंबईतील आंदोलनात इम्रान खानचा सहभाग

साम टिव्हीच्या वृत्तांनुसार, शनिवारी १० ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनात. अभिनेता इम्रान खान सहभागी झाला होता.यावेळी मुंबई पोलिसांनी अन्य आंदोलकांसह त्याच्यावरही कारवाई करत त्याला मुंबई पोलिसांच्या व्हॅनमध्ये जबरदस्ती भरले.

Mumbai Police have detained famous Bollywood actor Imran Khan
Katrina Kaif: कतरिना कैफच्या नव्या लूकवर चाहते फिदा! बॉडी शेमिंग करणाऱ्यांना अभिनेत्रीने दाखवला आरसा

या देशात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना इम्रान खान म्हणाला, मी या आंदोलनात देशाचा एक नागरिक म्हणून सहभागी झालो आहे. मी या देशात राहतो या देशात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या आहे. मी आज इथे आलो आहे कारण मला बघायचं आहे लोकांना त्यांचं स्वातंत्र्य जपण्यापासून का थांबवलं जातं.

Mumbai Police have detained famous Bollywood actor Imran Khan
Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान आता यूट्यूबवर! सलमान खानने सुरू केलं यूट्यूब चॅनेल, चाहत्यांसोबत शेअर केला पहिला खास व्हिडीओ

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

दरम्यान, १० ऑक्टोबर २०२६ रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकक्रोच जनता पार्टीने (CJP) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचे नियोजन केले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनेक आंदोलक आणि काही राजकीय नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुंबईत तुषार गांधी यांना ताब्यात घेतले

१० ऑक्टोबर रोजी मुंबईत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनाही आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ताब्यात घेतले. ते ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलनासाठी जात असताना ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्यांना अटक नव्हे, तर प्रतिबंधात्मक कारणास्तव ताब्यात घेतल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com