Shruti Vilas Kadam
कतरिना कैफचा लंडनमधील नवा लूक चाहत्यांना फार आवडला आहे . तिच्या स्टायलिश अंदाजाने आणि आत्मविश्वासाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अलीकडेच एका कार्यक्रमातील उपस्थितीनंतर कतरिनाच्या शरीरयष्टीवरून सोशल मीडियावर टीका करण्यात आली होती.
कतरिना लंडनमध्ये तिच्या ‘Kay Beauty’ या ब्युटी ब्रँडच्या ब्रिटनमधील लॉन्चला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमातील तिच्या लूकने विशेष लक्ष वेधले.
कतरिनाने ब्राऊन रंगाचा धोती-स्टाइल स्कर्ट, डार्क ब्राऊन ब्लेझर आणि स्टायलिश टॉप असा लूक निवडला होता. या हटके फॅशन स्टाइलमुळे तिच्या लूकची चर्चा रंगली.
कतरिनाने नैसर्गिक मेकअप, गुलाबी रंगाची लिपस्टिक आणि मोकळे केस असा साधा पण आकर्षक लूक केला होता. तिच्या स्टायलिश पोशाखाला या लूकने चार चाँद लावले.
कतरिनाने सोशल मीडियावरील टीकेचा आपल्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ देऊ नये, असे मत व्यक्त केले. प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास स्वतःचे निर्णय घेणे कठीण होऊ शकते, असेही तिने सांगितले.
कतरिनाच्या मते, कधी लोक आपले कौतुक करतात, तर कधी स्वतःलाच स्वत:ची हिंमत वाढवावी लागते. त्यामुळे लोकांच्या बोलण्याचा कधीच स्वत: वर वाईट परिणाम होऊ देऊ नका.