Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान आता यूट्यूबवर! सलमान खानने सुरू केलं यूट्यूब चॅनेल, चाहत्यांसोबत शेअर केला पहिला खास व्हिडीओ

Salman Khan: सलमान खानने अधिकृत यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे. या चॅनेलवरचा त्याचा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सलमान सह फराह खान, अक्षय कुमार, आलिया भट्टसह इतर कलाकारांच्या यूट्यूब चॅनेल्स सुरु केले आहेत.
Salman Khan
Salman KhanSaam Tv
Published On: 

Salman Khan: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने चाहत्यांसाठी एक खास घोषणा केली आहे. सलमानने शुक्रवारी त्याचे यूट्यूब चॅनेल सुरू केले. या चॅनेलच्या माध्यमातून तो चाहत्यांसोबत वैयक्तिक आयुष्य, व्यावसायिक प्रवास आणि चित्रपटांच्या पडद्यामागील खास क्षण शेअर करणार आहे. एका मजेशीर टीझर शेअर करुन त्याने या नव्या यूट्यूब चॅनेलची घोषणा केली.

हा व्हिडिओ शेअर करताना सलमानने, ‘चला सुरुवातीपासून सुरुवात करूया... माझे अधिकृत यूट्यूब चॅनेल. तुम्हाला येथे A ते Z पर्यंत सर्व काही पाहायला मिळेल,’ असे म्हटले. चॅनेलने पहिल्याच दिवशी ३६ हजारांहून अधिक सबस्क्राइबर्सचा टप्पा पार केला होता. सध्या या चॅनेलवर अनेक शॉर्ट्स आणि पहिला प्रिव्हूव व्हिडिओ शेअर केला आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून चाहत्यांना सलमानच्या दैनंदिन आयुष्याची झलक पाहता येणार आहे.

Salman Khan
Nana Patekar: नाना पाटेकरांच्या मनात होती चिंता! मुलगा मल्हारने भावुक होऊन सांगितला वडिलांसोबतचा अखेरचा संवाद

सलमान खानच्या आगामी चित्रपटांचीही चर्चा

कामाच्या बाबतीत सलमान खान सध्या ‘बिग बॉस २०’चे सूत्रसंचालन करत आहे. याशिवाय तो लवकरच ‘मातृभूमी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पूर्वीचे नाव ‘बॅटल ऑफ गलवान’ असे होते. अपूर्व लाखिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून चित्रांगदा सिंगचीही महत्त्वाची भूमिका आहे. तसेच, सलमान दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक वामसी पैदिपल्ली यांच्यासोबत ‘SVC63’ या चित्रपटावरही काम करत आहे. या चित्रपटात नयनताराची भूमिका असून तो २०२७ च्या ईदला प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Salman Khan
Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

या बॉलिवूड कलाकारांचीही आहेत यूट्यूब चॅनेल्स

सलमान खानप्रमाणेच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे यूट्यूबवर स्वत:चे चॅनेल आहे. दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानचे चॅनेल विशेष लोकप्रिय आहे. ती बॉलिवूड कलाकारांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत स्वयंपाक करते आणि त्यांच्या आयुष्यातील रंजक किस्से प्रेक्षकांसमोर आणते. तिच्या चॅनेलचे ३.२ दशलक्षांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. अभिनेता अक्षय कुमारच्या चॅनेलवर चित्रपटांचे प्रमोशन, ब्रँडशी संबंधित व्हिडिओ आणि विविध कार्यक्रमांमधील क्लिप्स पाहायला मिळतात. आलिया भट्ट तिच्या चॅनेलवर फिल्म शूटिंग, मेकअप आणि कुटुंबासोबतचे अनुभव शेअर करते. कृती सनॉन फिटनेस, स्किनकेअरचे व्हिडिओ शेअर करते. तर परिणीती चोप्रानेही स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com