Nana Patekar Death: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्याजवळील डोणजे येथील त्यांच्या फार्महाऊसवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नाना पाटेकर यांना पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांनी नानांना मुखाग्नी दिला. यावेळी चाहत्यांनी अमर रहे अमर रहे नानासाहेब अमर रहे, अशा घोषणा दिल्या.
नानांच्या अंत्यदर्शनासाठी लोकांनी गर्दी केली होती. वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते. पहाटे त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे सीपीआर देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता मात्र, त्यांना मृत घोषित करण्यात आले. नानांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरलीय.
गोव्यातील डोना पावलामधील घरी असताना पाटेकरांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना मणिपाल रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. नाना पाटेकर यांचे पार्थिव गोव्यातून विमानाने पुण्यात आणण्यात आले. पुणे विमानतळावर आल्यानंतर तेथून डोणजे गावाकडे नेण्यात आले. पाटेकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी अनेक दिग्गज कलाकार व राजकीय मंडळी उपस्थित होते. नानांच्या अखेरच्या दर्शनासाठी नागरिकांचा जनसागर लोटला होता. विविध श्रेत्रातील मान्यवरांनी नानांना श्रद्धांजली वाहिली.
'गमन'पासून सुरू झाला अभिनयाचा प्रवास
नाना पाटेकर यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर होते. अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी मोठा संघर्ष केला. १९७८ मध्ये ‘गमन’ या चित्रपटातून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या. १९८९ मधील ‘परिंदा’ हा त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यानंतर ‘अंगार’, ‘तिरंगा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्निसाक्षी’, ‘खामोशी : द म्युझिकल’, ‘अब तक छप्पन’, ‘अपहरण’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली. ‘क्रांतिवीर’मधील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
'नटसम्राट'मधून मराठी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान
२०१६ मध्ये आलेल्या ‘नटसम्राट’ चित्रपटातील गणपतराव बेलवलकर या भूमिकेने नाना पाटेकरांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ पाडली. या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर मराठी पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर ‘वेलकम’मधील उदय शेट्टी या विनोदी भूमिकेने त्यांच्या अभिनयातील आणखी एक पैलू प्रेक्षकांसमोर आणला. नाना पाटेकर यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अनेक फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. २०१३ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे एका पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.