Nana Patekar Family: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज ८ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. पहाटे ५:२० वाजता त्यांना मणिपाल रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दित फक्त चित्रपट नाही तर समाज आणि शेतकऱ्यांसाठी नाम फाऊंडेशन मार्फत अनेक महत्वाची कामं केली. पण, त्यांच्या परिवारात नेमकं कोण याबद्दल त्यांच्या चाहत्यांना फारशी माहिती नव्हती. त्यांनी नेहमीचं प्रसिद्धीपासून आपल्या परिवाराला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.
नाना पाटेकर यांचे खरे नाव विश्वनाथ दिनकर पाटेकर होते. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बालपणी आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण होती. त्यांच्या वडिल दिनकर पाटेकर, तर आई संजनाबाई पाटेकर होते. दिनकर पाटेकर टेक्सटाईल पेंटर म्हणून काम करत होते. लहानपणापासून अभिनयाची आवड असल्यामुळे पुढे नानांनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर अभिनय क्षेत्रात मोठे स्थान निर्माण केले.
पत्नी नीलकांती पाटेकर
नाना पाटेकर यांनी १९७८ मध्ये नीलकांती पाटेकर यांच्याशी लग्न केलं. नीलकांती या अभिनेत्री आणि लेखिका असून मराठी रंगभूमीसाठी त्या काम करत होत्या. नाना आणि नीलकांती यांची भेटही नाटकांच्या निमित्ताने झाली.त्यानंतर पुढे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतू काही वर्षांनंतर दोघांनी परस्पर संमतीने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा कायदेशीर घटस्फोट झालेला नव्हता. नानांनी यापूर्वीच्या मुलाखतींमध्येही त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केले होते.
मुलगा मल्हार पाटेकर
नाना आणि नीलकांती यांना दोन मुले झाली. मोठा मुलगा दुर्वासा आणि धाकटा मुलगा मल्हार. पण, त्यांचा मोठा मुलगा दुर्वासाचे तो अडीच वर्षांचे असताना आजारपणामुळे निधन झाले. मल्हारने काहीकाळ चित्रपटसृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे.
कुटुंबापासून प्रसिद्धी नेहमीच दूर
नाना पाटेकर पडद्यावरील भूमिका, स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध होते. मात्र वैयक्तिक आयुष्याबाबत त्यांनी नेहमीच प्रायव्हसी जपली. पत्नी आणि मुलाला प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. अभिनयासोबतच नाना शेती आणि सामाजिक कार्यातही सक्रिय होते. शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. परिंदा, क्रांतिवीर, अग्निसाक्षी, नटसम्राट आणि वेलकम यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.