Wardha News : आर्वीकरांना राज्य सरकारची नवरात्रोत्सव भेट, औद्योगिक वसाहत मंजूर

राज्याच्या उद्योग विभागाने एक रेकॉर्ड तयार करुन त्याला मान्यताही दिली.
Wardha, sumit wankhede, devendra fadnavis
Wardha, sumit wankhede, devendra fadnavissaam tv
Published On

- चेतन व्यास

Arvi Midc News : नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्यास राज्य शासनाने (maharashtra government) मंजुरी दिली. यामुळे राज्य शासनाची आर्वीकरांना नवरात्रोत्सवाची (navratri festival 2023) भेट ठरली आहे. ही वसाहत मंजूर व्हावी यासाठी आर्वीचे सुपुत्र व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (deputy cm devendra fadnavis) यांचे मानद सचिव सुमित वानखेडे (sumit wankhede) यांच्या प्रयत्नांना यश आल्याने आर्वीत जल्लाेष करण्यात आला. (Maharashtra News)

Wardha, sumit wankhede, devendra fadnavis
Shirdi Sai Baba Darshan : बहुचर्चित दर्शन रांगेचे लोकार्पण हाेणार, शिर्डीच्या आमदारांनी काढला मुहूर्त

वर्धा जिल्ह्यात दोन औद्योगिक वसाहती आहेत पण त्या वसाहती काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या देवळी पुलगाव विधानसभा मतदार संघात आहे. आमदार रणजित कांबळे यांनी आपल्या मतदार संघातील युवकांना रोजगार मिळावा म्हणून त्या आपल्या मतदार संघात उभारल्या आहेत.

Wardha, sumit wankhede, devendra fadnavis
Navratri Festival 2023 : नवरात्राेत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज, तुळजापुरसाठी जादा बसचे नियाेजन

आर्वी विधानसभा मतदार संघातही औद्योगिक वसाहत निर्माण ह्यावी अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होती. अखेर या मागणीचा पाठपुरावा आर्वीचे सुपुत्र व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (deputy cm devendra fadnavis) यांचे मानद सचिव सुमित वानखेडे (sumit wankhede) यांनी करत आर्वी भागात औद्योगिक वसाहत मंजूर करून घेतली.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच आर्वीत औद्योगिक वसाहत स्थापन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली. यामुळे राज्य शासनाची ही आर्वीकरांना नवरात्रोत्सवाची भेट ठरली आहे.

Wardha, sumit wankhede, devendra fadnavis
Ambabai Mandir: अंबाबाई मंदिरात चित्रणास जिल्हाधिकाऱ्यांनी घातली बंदी; नव्या आदेशाने कोल्हापुरात नाराजीचा सूर

आर्वीतील औद्योगिक वसाहतीकरिता तालुक्यातील अडेगाव परिसरातील ९.९१ हेक्टर, लाडणापूर परिसरातील ३६.५९ हेक्टर आणि लहादेवी परिसरातील ६७.८९ हेक्टर जमिनीचा समावेश आहे. ही जमिन आर्वी ते वर्धा या राज्य महामार्गालगत असल्याने यामुळे आता आर्वी ते वर्धा या महामार्गाला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे.

आर्वीमध्ये औद्योगिक वसाहत स्थापन करण्याकरिता उद्योजकांनी उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव तथा लोकसभा प्रमुख सुमित वानखेडे यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. त्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश एमआयडीसीच्या सचिवांना दिले.

राज्याच्या उद्योग विभागाने एक रेकॉर्ड तयार करुन त्याला मान्यताही दिली. या महत्त्वाचा कामाकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग सचिव हर्षदीप कांबळे व एमआयडीचे मुख्याधिकारी विपीन शर्मा यांचे सहकार्य लाभल्याचे सुमित वानेखेडे यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

Wardha, sumit wankhede, devendra fadnavis
Trains Cancelled : 17 ऑक्टोबरपर्यंत शालीमार एक्सप्रेस रद्द, जाणून घ्या कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com