Two People Are Arrested From Chandrapur's Warora Area For Betting On IPL 2024 Matches Saam tv
महाराष्ट्र

IPL 2024 Betting News: आयपीएलच्या मॅचवर सट्टा; ३० जणांवर गुन्हे दाखल, दोन जण पोलिसांच्या ताब्यात

Betting on IPL From Chandrapur's Warora Area: चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील बावने लेआउट येथील एका घरात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावला जात होता.

संजय तुमराम

चंद्रपूर : सध्या आयपीएलच्या क्रिकेट मॅच सुरु आहेत. यात रोज रंगतदार सामने बघावयास मिळत असून या मॅचवर जुगार खेळणाऱ्या दोन बुकिंना पोलिसांनी पकडले आहे. तर ३० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे क्रिकेटवर सट्टा चालवणारी टोळीच पोलिसांच्या हाती लागली आहे. 

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील वरोरा शहरातील बावने लेआउट येथील एका घरात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावला जात होता. सट्टा चालविला जात असलेल्या या घरावर पोलिसांनी धाड टाकत दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ओमप्रकाश देविदास जाधव,
व आशिष गजानन जाधव (रा. वरोरा) हे लॅपटॉप व मोबाईलच्या सहाय्याने इंडीयन प्रिमीयर लिगच्या (आय.पी.एल.) लाईव्ह मॅचवर ग्राहकांसोबत सौदे (IPL Betting) करीत असल्याचे आढळून आले. 

अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

पोलिसांना (Police) या जुगाराची माहिती मिळाल्यानुसार केलेल्या कारवाईत घटनास्थळावरून १० मोबाईल, १ लॅपटॉप, १ पेन ड्राईव्ह, २ कॅलक्युलेटर, एक दुचाकी व इतर साहित्य तसेच नगदी रक्कम ३२ हजार रुपये असा एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात एकूण तीस आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून ही जिल्ह्याच्या इतिहासातली आजवरची सर्वात मोठी सट्टाविरोधी कारवाई मानली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaidehi Parshurami: बोलके डोळे अन् हसरं सौंदर्य, वैदेहीचे फोटो पाहून नजर लागेल

Maharashtra Live News Update:अंबरनाथ रेल्वे स्थानकात तिकीट खिडकीवर प्रवाशांना तिकीट नाकारले जात आहे.

Marathi Actress: बोलक्या डोळ्यांच्या या अभिनेत्रींना ओळखलं का? हे फोटो एकदा पाहा

Nashik Tourism : हिवाळ्यात ट्रेकिंग करायला आवडतं? मग 'हे' ठिकाण तुमच्यासाठी ठरेल बेस्ट

राज ठाकरेंनी ‘मुळशी पॅटर्न’ फेम रमेश परदेशीला सुनावलं; एकाच ठिकाणी राहा|VIDEO

SCROLL FOR NEXT