Akola News : संशयित आरोपी मृत्यू प्रकरण : धक्कादायक माहिती आली समोर; कस्टडी रूमचा सीसीटीव्ही होता बंद

Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट पोलिस ठाण्यातील कस्डटीत असलेल्या गोवर्धन हरमकार याचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता.
Akola News
Akola NewsSaam tv

अक्षय गवळी

अकोला : पोलिसांच्या मारहाणीत कस्टडीत असलेल्या संशयित आरोपीच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. या माहितीमुळे गोवर्धनच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात गेले आहे. या प्रकरणात गोवर्धनचा मृत्यू झाला त्या कस्टडी रूमचा सीसीटीव्ही कॅमेरा मागील सहा महिन्यांपासून बंद असल्याची माहिती आता समोर येत आहे.

Akola News
Nandurbar Police : दोन कोटीचे अंमली पदार्थ जप्त; निवडणुकीच्या काळात पोलिसांची कारवाई

अकोला (Akola) जिल्ह्यातील अकोट पोलिस ठाण्यातील कस्डटीत असलेल्या गोवर्धन हरमकार याचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. गोवर्धन हरमकार याचा पोलिसाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याच प्रकरण साम'टीव्हीने उघडकीस आणलं होतं, त्यानंतर ११ पोलिसांवर कारवाई झाली. आतापर्यंत पीएसआयसह ३ पोलिस कर्मचाऱ्यांवर खुनाचे गुन्हे दाखल असून दोघे अटकेत आहे, या प्रकरणाचा अजून देखील तपास सुरु असून या प्रकरणात पोलिसांवर (Police) गुन्हे दाखल झाले आहेत. असे असले तरी त्याच्या मृत्यू प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

Akola News
Crop Loan : वाशिम जिल्ह्यातील ५१ हजार ५८९ शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप

१८ जानेवारीदरम्यान तत्कालीन ठाणेदार तपण कोल्हे यांनी पोलिस स्टेशनमधील कस्टडी रुमचा सीसीटीव्ही बंद असल्याबाबत पोलिस अधिक्षकांना पत्र लिहले होते. एसपींच्या पत्रानंतर पुण्यातील सुजाता कॉम्प्युटर या कंपनीचे इंजिनिअर अरुण पाटील हे (Akot Police) अकोट पोलिस स्टेशनला आले होते. त्यांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्यात बिघाड असल्याचा खुलासा केला. त्यामुळे पोलिसांच्या परवानगीने त्यांनी डीव्हीआर काढून घेवून गेले. त्यानंतर त्यांनी कळवले की यामध्ये मागील सहा महिन्यापासून कोणतेही रेकॉर्डींग झाले नसल्याचे सांगितले. 

एकच सीसीटीव्ही बंद कसा? 
पोलिस स्टेशनमधील सर्व कॅमेरे चालू असताना नेमका हाच कॅमेरा कसा बंद असल्याने याबाबत शंका उपस्थित होत आहे. शिवाय काढून नेलेला डीव्हीआर मध्ये १५ ते १७ जानेवारी दरम्यानच्या घडलेल्या घटनांची नोंद असण्याची शक्यता आहे. मात्र पोलिसांनी बचाव करण्यासाठी सदर डीव्हीआर जाणीवपूर्वक काढून घ्यायला लावला. त्यानंतर १८ तारखेच्या दरम्यान पोलिस निरिक्षकांकडून एसपींना पत्रव्यवहार झाला. हा सर्व प्रकार संशयास्पद असून पुरावे नष्ट करण्यासाठी तर हा प्रकार केला नसावा अशीही चर्चा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com