Crop Loan : वाशिम जिल्ह्यातील ५१ हजार ५८९ शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप

Washim News : खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैशाची निकड भासू नये. यासाठी बँकांकडून पीककर्ज वाटप केले जाते.
Crop Loan
Crop LoanSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 

वाशिम : खरीप व रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज उपलब्ध करून दिले जात असते. त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामासाठी कर्ज वाटपास सुरवात करण्यात आली असून वाशीम जिल्ह्यात आतापर्यंत ५१ हजार ५८९ शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. 

Crop Loan
Ulhasnagar News : उपचारासाठी नेत असल्याचे सांगून ५ महिन्याच्या बालकाचे अपहरण; दोन महिला पोलिसांच्या ताब्यात

खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये वाशिम (Washim) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैशाची निकड भासू नये. यासाठी बँकांकडून पीककर्ज वाटप केले जाते. त्यानुसार १ एप्रिलपासून कर्ज वितरणाला प्रारंभ झाला आहे. महिनाभराच्या कालावधीत ५१ हजार ५८९ शेतकऱ्यांना (Farmer) कर्जवाटप करण्यात आले आहे. हे वाटप मागील महिनाभरात झाले आहे. 

Crop Loan
Nandurbar Police : दोन कोटीचे अंमली पदार्थ जप्त; निवडणुकीच्या काळात पोलिसांची कारवाई

खरीप हंगाम पेरणीपूर्वीच ७५ टक्के शेतकऱ्यांना कर्जवाटप (Crop Loan) करावे; अशा सूचना वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी सर्व बँकांना दिल्या आहेत. १३ मेपर्यंत ५१ हजार ५८९ शेतकऱ्यांना ५०५ कोटी २९ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. कर्ज वाटपामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक आघाडीवर असून, खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका कर्जवाटपात पिछाडीवर आहेत. सर्व बँकांनी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com