Shiv Sena And NCP MLA Disqualification Case  Saam Tv
महाराष्ट्र

Shivsena NCP MLA Case: तारीख ठरली! शिवसेना- राष्ट्रवादीच्या आमदारांचा एकाच दिवशी 'फैसला' होणार; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

Shivsena NCP MLA Disqualification Case: राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुप्रीम कोर्टातील सुनावणी एकाच दिवशी होणार आहे. दोन्ही सुनावण्या एकापाठोपाठ एक ऐकल्या जातील, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. ३० जुलै २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीबाबत सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुप्रीम कोर्टातील सुनावणी एकाच दिवशी होणार आहे. ७ ॲागस्ट रोजी एकाच दिवशी एकापाठोपाठ एक या दोन्ही सुनावण्या पार पडणार आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी शरद पवार गट आणि ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी याचिका जाहीर केली होती. शिंदे गट तसेच अजित पवार गटातील आमदारांना अपात्र करावे अशी मागणी यामधून करण्यात आली होती.

गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणी सुनावणी होत नव्हती. अखेर या दोन्ही सुनावण्यांची तारीख आता सुप्रीम कोर्टाने जाहीर केली आहे. ७ ऑगस्ट रोजी शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेची सुनावणी पार पडेल, दोन्ही सुनावण्या एकापाठोपाठ एक ऐकल्या जातील, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, याआधी सुप्रीम कोर्टाकडून शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणीला सप्टेंबर महिन्यातील तारीख दिली होती. तर काल झालेल्या राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणीत दोन्ही प्रकरणे एकदाच ऐकू असे म्हणत ३ ऑगस्टची तारीख दिली होती. त्यानंतर आता शिवसेनेची सुनावणीही त्याचदिवशी घेण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

SCROLL FOR NEXT