Ulhasnagar Politics : राजकीय घडामोडींना वेग; कलानी गट पुन्हा शरद पवार गटात जाणार? उल्हासनगरात महायुतीचं टेन्शन वाढणार?

pappu kalani news : उल्हासनगरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कलानी गट पुन्हा शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. कलानी गटाच्या चर्चेने उल्हासनगरात महायुतीचं टेन्शन वाढल्याचं बोललं जात आहे.
राजकीय घडामोडींना वेग; कलानी गट पुन्हा शरद पवार गटात? उल्हासनगरात महायुतीचं टेन्शन वाढणार?
Ulhasnagar Politics : Saam tv
Published On

उल्हासनगर : विधानसभेआधी राजकीय घडमोडींना वेग आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. उल्हासनगरातील कलानी गटालाही आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. उल्हासनगरात सध्या भाजपचे आमदार आहेत. आता या विधानसभा मतदारसंघात कलानी गटाने चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. कलानी गट येत्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलानी गटाला राजकीय वेध लागले आहेत. या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलानी गटाचं गोव्यात अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाला शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही उपस्थिती दर्शवली आहे. जिंतेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

राजकीय घडामोडींना वेग; कलानी गट पुन्हा शरद पवार गटात? उल्हासनगरात महायुतीचं टेन्शन वाढणार?
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी शिंदे गटाला मोठा धक्का, अजित पवारांनी गेम केला; शिवसेनेचा विश्वासू नेताच फोडला

पप्पू कलानी आणि त्यांचं कुटुंब उल्हासनगरच्या राजकाराणातील बलाढ्य कुटुंब म्हणून ओळखलं जातं. पप्पू कलानी यांनी उल्हासनगरतं ४ वेळा प्रतिनिधित्व केलं आहे. कलानी हे १९९०, १९९५, १९९९ आणि २००४ साली उल्हासनगरचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या पत्नी ज्योती कलानी देखील २०१४ साली निवडून आल्या होत्या. एका प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगणारे कलानी सध्या जेलमधून बाहेर आले आहेत. सध्या कलानी यांचा मुलगा ओमी यांनी त्यांच्या टीम ओमी कलानीच्या माध्यमातून शहरात राजकीय दबदबा निर्माण केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पप्पू कलानी यांनी शहर पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कलानी गटाने पाठिंबा दिला होता. आता भाजपचा आमदार असलेल्या उल्हासनगरमध्ये कलानी यांनी शरद पवार गटातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

राजकीय घडामोडींना वेग; कलानी गट पुन्हा शरद पवार गटात? उल्हासनगरात महायुतीचं टेन्शन वाढणार?
Maharashtra Politics: ब्रेकिंग! अजित पवारांसह ४१ आमदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; सेना- राष्ट्रवादीच्या सुनावणीबाबत घेतला मोठा निर्णय

पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी हे यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कलानी गटाची काय भूमिका राहील, यासाठी या गटाचं गोव्यात अधिवेशन सुरु आहे. याच अधिवेशनाला शरद पवार गटाचे आमदार जिंतेंद्र आव्हाड हे उपस्थित राहिले आहेत. यामुळे कलानी गट शरद पवार गटाकडून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना बळ मिळालं आहे. त्यामुळे उल्हानगरात विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com