Ulhasnagar Assembly Constituency : उल्हासनगरात भाजप पुन्हा सत्ता राखणार का? कलानी कुटुंब कोणती नवीन चाल खेळणार?

Maharashtra assembly election : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी राजकीय हालचाली सुरु केल्या आहेत. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघा भाजप पुन्हा सत्ता राखणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
उल्हासनगरात भाजप पुन्हा सत्ता राखणार का? कलानी कुटुंब कोणती नवीन चाल खेळणार?
Ulhasnagar Assembly ConstituencySaam tv
Published On

उल्हासनगर : मुंबईजवळील उल्हासनगर शहर सिंधी बहुल वस्ती म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे या शहराला अनेक जण सिंधूनगर नावानेही ओळखतात. या शहरात १९९० सालापासून कलानी कुटुंबाचं वर्चस्व आहे. मात्र, या वर्चस्वाला २०१९ सालच्या निवडणुकीत भाजपच्या कुमार आयलानी यांनी सुरंग लावला. या विधानसभा मतदारसंघात अवघ्या २ हजारांच्या मतांनी भाजपच्या आयलानी यांनी बाजी मारली. आता आगामी विधानसभा निवडणुकीत आयलानी यांची जादू पुन्हा चालणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ हा कल्याण लोकसभा मतदारसंघातील भाग आहे. या विधानसभा मतदारसंघात २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कुमार आयलानी यांना ४५,६६६ मते मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्योती पप्पू कलानी यांना दुसऱ्या क्रमांची मते मिळाली होती. अवघ्या २००४ मतांच्या फरकाने कुमार आयलानी यांनी ज्योती कलानी यांचा पराभव केला होता.

उल्हासनगरात भाजप पुन्हा सत्ता राखणार का? कलानी कुटुंब कोणती नवीन चाल खेळणार?
Political News : उद्धव ठाकरेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी; देवेंद्र फडणवीसांना व्हिलन केलं जातंय; बावनकुळे कडाडले

२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ज्योती पप्पू कलानी या ४३,७६० मते मिळवून विजयी झाल्या होत्या. तर भाजपचे कुमार आयलानी यांना दुसऱ्या क्रमांकांची मते मिळाली होती. अवघ्या १८६३ मतांच्या फरकाने कुमार आयलानी यांना पराभव स्वीकारावा लागला होता. तर यंदा आगामी विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ज्योती पप्पू कलानी यांचं वयाच्या ७० व्या वर्षी २०२१ साली निधन झालं. ज्योती यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. उल्हासनगरातून ४ वेळा आमदारकी भूषणवणारे पप्पू कलानी तुरुंगात गेल्यानंतर २०१४ साली झालेल्या निवडणुकीत ज्योती कलानी निवडून आल्या होत्या.

यंदा कोण बाजी मारणार?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी तयारी केली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत कुमार आयलानी भाजपकडून निवडणूक लढवली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्योती कलानी निवडणुकीच्या रिंगणात होत्या.

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कुमार आयलानी यांनी ज्योती कलानी यांचा पराभव करून कलानी कुटुंबाचं वर्चस्व मोडीत काढलं होतं. तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवडणुकीच्या प्रचाराला कुमार आयलानी यांनी हजेरी लावली. तर दुसरीकडे दोस्तीच्या नावाखाली पप्पू कलानी यांनीही श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराला हजेरी लावली होती. कुमार आयलानी आणि पप्पू कलानी यांनी एकत्र श्रीकांत शिंदे यांचा प्रचार केला होता.

उल्हासनगरात भाजप पुन्हा सत्ता राखणार का? कलानी कुटुंब कोणती नवीन चाल खेळणार?
Political News: अजित पवार गटाला मोठा धक्का; माजी आमदार विलास लांडेंसह 15 नगरसेवकांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश!

कलानी कुटुंब कोणती चाल खेळणार?

एकीकडे ओमी कलानी हे उल्हासनर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. कलानी कुटुंबाने राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर ओमी कलानी यांनी टीम ओमी कलानी नावाची राजकीय संघटना तयार केली आहे. तर ओमी कलानी शरद पवार गटात परततील, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शरद पवार गटात प्रवेश रखडला, तर ओमी कलानी अपक्ष लढतील, असंही बोललं जात आहे. या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे भाजपचे आहेत. त्यामुळे महायुतीकडून या जागेवर पुन्हा आमदार कुमार आयलानी यांना उमेदवारी मिळणार का, याकडेही साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com