माजी आमदार ज्योती कलानी यांच्यावर अंत्यसंस्कार:अंत्यसंस्काराला माजी आमदार पप्पू कलानी उपस्थित

Jyoti Kalani
Jyoti Kalani
Published On

उल्हासनगर:  उल्हासनगर Ulhasnagar च्या माजी आमदार MLA ज्योती कलानी Jyoti Kalani यांचे रविवारी त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात माजी आमदार पती पप्पू कलानी, मुलगा ओमी कलानी, सून पंचम कलानी, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. आज ज्योती कलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्योती कलानी यांच्यावर दुपारी साडे तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आला. दरम्यान स्मशानभूमी बाहेर प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी कोरोना प्रादुर्भावामुळे मोजक्या लोकांना स्मशानभूमीच्या आत जाऊ देण्यात आले. Funeral of former MLA Jyoti Kalani

ज्योती कलानी यांचे पती पप्पू कलानी Pappu Kalani इंदर बटीजा Indar Batija हल्या प्रकरणात शिक्षा भोगत आहेत.. त्यांना आज पत्नीच्या मृत्यू मुळे १४ दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. ते उल्हासनगर मधील बंगल्यात दुपारी दीड वाजता आल्यानंतर लगेच अंत्ययात्रेला सुरुवात झाली. येथील फक्कड मंडली स्मशान भूमीत ज्योती कलानी यांच्यावर दुपारी साडे तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान स्मशानभूमी बाहेर प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी कोरोना प्रादुर्भावामुळे मोजक्या लोकांना स्मशानभूमीच्या आत जाऊ देण्यात आले. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. अंत्ययात्रेस गर्दी होऊ नये म्हणून सोशल मीडियावर अंत्ययात्रेचा वेळ ५ वाजता व्हायरल करण्यात येऊन अंत्ययात्रा दोन वाजता काढण्यात आली. 

उल्हासनगर चे कलानी पर्व:
पप्पू कलानी जेलमध्ये असताना ही १९९२ ते २००२ पर्यंत उल्हासनगर महापालिकेत एकहाती सत्ता आणण्यात ज्योती कलानी यांचा मोठा हात होता. उल्हासनगर महानगरपालिकेत त्या २००१-२००७ पर्यंत स्थायी समिती सभापती होत्या. २००५ मध्ये त्या महापौर Mayor होत्या. २०१३ मध्ये पप्पू कलानी याना इंदर बढीजा हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली.

त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत Assembly elections भाजपचे BJP तत्कालीन आमदार कुमार आयलानी Kumar Aylani यांचा ज्योती कलानी यांनी पराभव केला होता. त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून NCP आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्षपद भूषविले होते. पप्पू कलानी शहरात नसतानाही खंबीरपणे राजकारणाची धुरा संभाळणाच्या ज्योती कलानी यांना आयर्न लेडी Iron Lady म्हणून ओळखल्या जायच्या 

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com