Pune Hit And Run Case: अपघात झाला तुम्हाला कसं कळलं? सुनील टिंगरे यांची पोलिसांकडून तब्बल ४ तास चौकशी

MLA Sunil Tingare Introgation : राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे यांची पुणे पोलिसांनी तब्बल ४ तास चौकशी केलीय. पोलिसांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केलाय. दरम्यान कल्याणीनगर अपघात प्रकरणात त्यांनी पोलिसांना काय उत्तर दिले ते जाणून घेऊ.
Pune Hit And Run Case: अपघात झाला तुम्हाला कसं कळलं? सुनील टिंगरे यांची पोलिसांकडून तब्बल ४ तास चौकशी
Pune Hit And Run Case Saam tv
Published On

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या हिट अँड रन प्रकरणी आमदार सुनिल टिंगरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सुनिल टिंगरे संशयाच्या फेऱ्यात असून आज पोलिसांकडून त्यांची तब्बल ४ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीत पोलिसांनी त्यांच्यावर अपघाताप्रकरणी प्रश्नांचा भडीमार केलाय.

कल्याणीनगरमध्ये अपघात झाला हे तुम्हाला कोणी कळवलं? अपघात झाल्यानंतर तुम्ही काय केलं? अशा प्रश्नांची सरबत्ती पोलिसांनी आमदार टिंगरे यांच्यावर केली. दरम्यान सुनिल टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. टिंगरे याचं नाव या पोर्शे कार हिट अँड रन प्रकरणात अपघाताच्या पहिल्या दिवसापासून समोर येऊ लागलं आहे. या अपघातात त्याचा सहभाग काय होता, असा प्रश्न केला जात आहे. दरम्यान अपघात ज्या रात्री झाला त्या रात्री आमदार सुनिल टिंगरे हे संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गेले होते.

त्या प्रकरणाचा गुन्ह्यामधील काही कलमे कमी करत त्यांनी या हे प्रकरण कमजोर केल्याच्या आरोप त्यांच्यावर केला जात आहे. आमदार टिंगरेच्या हस्तक्षेपामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी सुनील टिंगरे यांना विचारले अनेक महत्त्वाचे प्रश्न

कल्याणी नगर मध्ये अपघात झाला हे तुम्हाला कोणी कळवले?

अपघात झाल्यानंतर तुमचा घटनाक्रम काय होता?

अपघात प्रकरणी तुमची भूमिका काय आहे?

तुमचं ससून रुग्णालयातील डॉ अजय तावरे यांच्याशी काही बोलणं झालं का?

दरम्यान कल्याणीनगर अपघातप्रकरणी पुणे पोलिसांनी सुनील टिंगरे यांची तब्बल ४ तास चौकशी केली. दरम्यान या चौकशीत चौकशीत टिंगरे यांनी काय उत्तरं दिले हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.

दरम्यान हा कार अपघात वाहनामधील तांत्रिक बिघाडामुळे झाला असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु अपघात झालेल्या पोर्शे कारमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड नव्हता, पोर्शे कंपनीने केलेल्या अधिकृत तपासणीच्या अहवालातून ही माहिती स्पष्ट झाली आहे. कंपनीकडून अधिकृत अहवाल पोलिसांना सुपूर्द केलाय. या घटनेप्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Pune Hit And Run Case: अपघात झाला तुम्हाला कसं कळलं? सुनील टिंगरे यांची पोलिसांकडून तब्बल ४ तास चौकशी
Pune Porsche Crash : कल्याणी नगर अपघातप्रकरणी मोठी अपडेट; पोर्शे कारमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com