Jalna Accident: जालन्यात थरारक अपघात! भरधाव आयशरने मायलेकीसह चौघांना उडवले, सहा वर्षाच्या चिमुकलीसह ३ ठार; चालक फरार

Jalna Speeding Truck Accident News: शाळेतून घरी जाणाऱ्या मायलेकीसह, सहा वर्षीय मुलीला आणि एक ज्येष्ठ नागरिकाला भरगाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने जोराची धडक दिली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला.
Jalna Accident: जालन्यात थरारक अपघात! भरधाव आयशरने मायलेकीसह चौघांना उडवले, ३ जागीच ठार; चालक फरार
Jalna Latest News: Saamtv
Published On

अक्षय शिंदे, जालना|ता. ३० जुलै २०२४

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे सत्र सुरू आहे. काल सायंकाळी वर्ध्यामध्ये भरधाव ट्रकने अनेक वाहनांना उडवल्याची घटना घडली होती. हे अपघात प्रकरण ताजे असतानाच जालन्यामधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. भरधाव आयशरने धडक दिल्याने माय- लेकींसह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्याच्या मंठा शहरात घडली आहे.

Jalna Accident: जालन्यात थरारक अपघात! भरधाव आयशरने मायलेकीसह चौघांना उडवले, ३ जागीच ठार; चालक फरार
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी शिंदे गटाला मोठा धक्का, अजित पवारांनी गेम केला; शिवसेनेचा विश्वासू नेताच फोडला

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील मंठा शहरात सोमवारी मोठा अपघात झाला. शाळेतून घरी जाणाऱ्या मायलेकीसह, सहा वर्षीय मुलीला आणि एक ज्येष्ठ नागरिकाला भरगाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातामध्ये सहा वर्षीय मुलगी, महिला आणि एका ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी अंत झाला.

सीमा चव्हाण (वय 24 वर्ष) मारिया पठाण (वय, 6 वर्ष) आणि रूपला राठोड (वय 65 वर्ष) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर या घटनेत इशिका चव्हाण ही चार वर्षांची चिमुकली जखमी झाली आहे. या अपघातानंतर आयशर चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Jalna Accident: जालन्यात थरारक अपघात! भरधाव आयशरने मायलेकीसह चौघांना उडवले, ३ जागीच ठार; चालक फरार
Jharkhand Train Accident : मोठी बातमी! हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेस रुळावरून घसरली; अनेक प्रवासी जखमी, बचावकार्य सुरू

दरम्यान, अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. भीषण अपघातात तीन निष्पाप लोकांचा बळी गेल्याने मंठा शहरासह परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन कडक शिक्षा करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Jalna Accident: जालन्यात थरारक अपघात! भरधाव आयशरने मायलेकीसह चौघांना उडवले, ३ जागीच ठार; चालक फरार
Pimpari-Chinchwad Crime: उरणनंतर पिंपरी-चिंचवड हादरले! लग्नाला नकार दिला, रागाच्या भरात तरुणाने तरुणीसोबत केलं भयंकर कृत्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com