भरत मोहळकर , साम टीव्ही, प्रतिनिधी
राज्याच्या आजी-माजी गृहमंत्र्यांचा वाद टोकाला गेलाय. फडणवीसांनी दिलेलं आव्हान स्वीकारत अनिल देशमुखांनी आरोपांची मालिकाच सुरु केलीय. फडणवीसांनी समित कदम नावाच्या व्यक्तीला प्रतिज्ञापत्रं घेऊन आपल्याकडे पाठवल्याचा आरोप देशमुखांनी केलाय. त्याचे आणि फडणवीसांचे घनिष्ट संबंध असल्याचाही दावा देशमुखांनी केलाय.
तर साधा नगरसेवकही नसलेल्या समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा का? असा सवालही देशमुखांनी विचारलाय. मात्र हे सर्व आरोप समित कदम यांनी फेटाळून लावले आहेत. समित कदम आणि फडणवीसांचे घनिष्ट संबंध असल्याचं अनिल देशमुख म्हणाले आहेत. तर यावर आपली प्रतिक्रिया देताना समित कदम म्हणाले की, अनिल देशमुखांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.
तर दुसरीकडे भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही समित कदमचा शरद पवारांसोबतचा फोटो ट्विट करत पलटवार केलाय. तसंच यापुढे केवळ तीन तासांत देशमुखांचा पर्दाफाश करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.
फडणवीसांकडून त्यांचे राजकीय विरोधक उद्धव ठाकरेंनाच नाही तर तेव्हाचे विरोधक आणि सध्या सत्तेत असलेल्या अजित पवारांचे पूत्र पार्थ पवारांना अडकवण्याचा डाव रचल्याचा आरोपही देशमुखांनी केलाय.
हे प्रकरण जुनं असलं तरी आरोप प्रत्यारोपांमुळे यातले नवनवे खुलासे मात्र होत असल्याचं दिसतायत. वेळ आल्यास आपल्याकडचे ऑडिओ-व्हिज्युअल पुरावे उघड करीन, अशा इशारा फडणवीसांनी दिला होता. आता अनिल देशमुखांनी फडणवीसांचे फोटो दाखवल्यामुळे फडणवीस कधी आणि कसा पलटवार करणार याची उत्सुकता साऱ्या राज्याला लागलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.