अक्षय बडवे, साम प्रतिनिधी
पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याचा एक कारनामा समोर आलाय. पनवेलमधील एका ऑर्केस्ट्रामध्ये २ जणांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केलीय. याप्रकरणी पनवेलमधील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. ऑर्केस्ट्रामध्ये नाचताना वाद झाल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी दोन जणांना मारहाण केली.
मारहाणानंतर त्या तरुणाच्या अंगावरील सोने लुटले असल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांवर करण्यात आलाय. या दोन्ही पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार गणेश गीते यांनी दिलीय. निर्मल हरिहर असं एका भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे दोघे ही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. २० जुलै रोजी फिर्यादी आणि त्यांचा मित्र पनवेलमधील एका ऑर्केस्ट्रामध्ये गेले होते. त्या ठिकाणी आरोपी आणि त्यांचे मित्र सुद्धा त्या ठिकाणी उपस्थितीत होते. दरम्यान मध्यरात्री १२ ते १ वाजताच्या सुमारास नाचत असताना आरोपींनी फिर्यादीला मुद्दाम धक्का दिला.
फिर्यादी यांनी त्याचा जाब विचारला असता आरोपींनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. तसेच यावेळी फिर्यादी यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली असल्याचा आरोप केलाय. याप्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
काय आहे प्रकरण
महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील ठेका मिळवण्याच्या वादातून ही हाणामारी झाल्याचं सांगितलं जात आहे. पुणे शहरातील खडक पोलीस ठाण्यात ठेकेदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. निर्मल हरीहर (रा. २३१, गंजपेठ, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पुणे महापालिकेचे अभियंता गणेश राजेंद्र गिते (३७, रा. भवानी पेठ) यांनी फिर्याद दिलीय.
गिते यांच्या फिर्यादीनुसार, ते त्यांचा मित्र कमलेश क्षीरसागर याच्यासोबत पनवेल येथील बिंदास ऑर्केस्ट्रा बारमध्ये २० जुलै रोजी गेले होते. त्यावेळी गिते यांच्या ओळखीचे निर्मल हरीहर हे त्यांच्या चार मित्रांसोबत तेथे आले. मध्यरात्री १२ ते १ च्या सुमारास सगळे जण नाचताना निर्मल हरीहर याने गिते यांना मुद्दाम दोन ते तीन वेळा धक्का दिला.
यानंतर गिते यांनी मला धक्का का देतो? असे निर्मल याला विचारले. त्यानंतर निर्मल यांनी परत जोरात धक्का देऊन गिते यांना खाली खुर्चीवर पाडले. तसेच त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चैन हिसकावली, असं गिते यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.