Pune Crime News: 'मी IAS अधिकारी, नादाला लागू नको', धमकी देत पैसे उकळले, पुण्यातील तरुणीचा प्रताप, अवैध सावकारीचा गुन्हा दाखल

Pune Fake IAS Officer News: आएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण चर्चेत असतानाच पुण्यामध्ये आणखीन एक बनावट आयएएस अधिकारी धुमाकूळ घालत असून धमकी देत पैसे उकळत असल्याचा प्रकार समोर आला आहे
Pune Fake IAS Officer News: 'मी IAS अधिकारी, नादाला लागू नको', धमकी देत पैसे उकळले, पुण्यातील तरुणीविरोधात गुन्हा
Pune Fake IAS Officer News: Saamtv
Published On

नितीन पाटणकर, पुणे|ता. २७ जुलै २०२४

वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण राज्यातच नव्हेतर देशभरात गाजत आहे. पूजा खेडकर यांच्यासह त्यांची आई मनोरमा खेडकर यांचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत. अशातच आता पुण्यामध्ये आणखी एक बनावट अधिकारी धुमाकूळ घालत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Pune Fake IAS Officer News: 'मी IAS अधिकारी, नादाला लागू नको', धमकी देत पैसे उकळले, पुण्यातील तरुणीविरोधात गुन्हा
Pune Flood Video: माणुसकीला सलाम! घरात कमरेइतकं पाणी, जीवाची बाजी लावून रेस्क्यू टीमने मुक्या प्राण्यांना वाचवलं; पाहा VIDEO

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण चर्चेत असतानाच पुण्यामध्ये आणखीन एक बनावट आयएएस अधिकारी धुमाकूळ घालत असून धमकी देत पैसे उकळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ⁠रेणुका ईश्वर करनुरे असे या तोतया आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे.

पुण्यातील वडकी परिसरात राहणाऱ्या रेणुका ईश्वर करनुरे ही परिसरातील अनेक महिलांना व्याजाने पैसे देत असून दरमहा दहा रुपये टक्क्याने ते उकळत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. ⁠या प्रकरणी रेणुका विरोधात एका 31 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलिसात अवैध सावकारकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Pune Fake IAS Officer News: 'मी IAS अधिकारी, नादाला लागू नको', धमकी देत पैसे उकळले, पुण्यातील तरुणीविरोधात गुन्हा
Maharashtra Politics : मला भ्रष्टाचाराचा सुभेदार म्हणणारे स्वतः तडीपार; शरद पवारांचा अमित शहांना टोला, पाहा VIDEO

⁠31 वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, तिला तोतया आयएएस अधिकारी रेणुका हिने दोन लाख 68 हजार रुपये व्याजाने दिले होते. या बदल्यात पीडितेने रेणुकाला आतापर्यंत तीन लाख 48 हजार रुपये परत दिले. तरीही रेणुका हिने आणखी चार लाख 55 हजार रुपयांची मागणी करत पिढीतील त्रास देत धमकवण्यास सुरुवात केली.

मी आयएएस अधिकारी आहे माझ्या नादीला लागू नको, तुला कामाला लावेल. माझे पैसे तू ताबडतोब दे अशा धमक्या तिने पीडितेला दिल्या. ⁠या सगळ्या त्रासानंतर पीडित महिलेने लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आता बनावट आयएस अधिकारी रेणुका ईश्वर करनुरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आहे.

Pune Fake IAS Officer News: 'मी IAS अधिकारी, नादाला लागू नको', धमकी देत पैसे उकळले, पुण्यातील तरुणीविरोधात गुन्हा
Nashik Crime: जेलमधून सुटताच 'रोड शो', आता भररस्त्यातून निघाली धिंड, नाशिकच्या 'बॉस'ची पोलिसांनी जिरवली; मिरवणूक अंगलट आली!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com