पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अनेक घरांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे पुरसदृश्य परिस्थिती असलेल्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करुन अनेक नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. याच रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पुण्यातील एका सामाजिक संस्थेने १४ कुत्रे आणि १ मांजरीला सुखरुप बाहेर काढले आहे. पुण्यातील एका घरात १४ कुत्रे आणि एक मांजर राहत होती. एक वयोवृद्ध महिला या पाळीव प्राण्यांचा सांभाळ करत होत्या. त्यांच्या घरात पाणी घुसल्याने हे त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले.
पुण्यात एका वसाहतीत लोकांच्या छातीपर्यंत पाणी साचले होते.या पाण्यातून लोकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी अनेक सामाजिक संस्थानी रेस्क्यू ऑपरेशन केले. यातील आरएसक्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या टीमने तब्बल १४ कुत्रे आणि मांजरीला सुखरुप बाहेर काढले आहे. यामुळे या टीमचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे.
या टीमचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात सामाजिक संस्थेतील अनेक लोक छातीपर्यंत असलेल्या पाण्यातून वाट काढताना दिसत आहे. त्यांनी अनेक कुत्र्यांना आणि मांजरीला या पाण्यातून बाहेर काढले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेच्या घरात तिने १४ कुत्रे आणि मांजर पाळली होती. तिच्या घरात खूप पाणी घुसले होते. यावेळी रेस्क्यू टीमने तिला मदतीचा हात पुढे केला. परंतु महिलेने सर्वप्रथम तिच्या पाळीव प्राण्यांना सुखरुप बाहेर काढण्यास सांगितले. त्यानंतर स्वतः या पाण्यातून वाट काढत बाहेर आली. त्यामुळे या महिलेचे प्राण्यांबद्दलचे प्रेम खूप वेगळेच आहे. या रेस्क्यू टीमचेही खूप कौतुक केले जात आहे.
Neha Panchamiya या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्या या रेस्क्यू टीमचे नेतृत्व करतात. त्यांना प्राण्यांबद्दल विशेष प्रेम आहे. प्राणी संवर्धनाच्या कामात त्यांचे विशेष योगदान आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.