VIDEO: नद्यांना पूर, मगरी रस्त्यावर! मुंबई, रत्नागिरी, सांगलीत मगरींची दहशत; पाहा व्हिडिओ

Crocodile Viral Video: मुसळधार पाऊस झाला...नद्यांना पूर आला आणि मगरी थेट पात्राबाहेर येऊ लागल्यात. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी थेट नागरी वस्तीत मगरींचा वावर वाढू लागलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
नद्यांना पूर, मगरी रस्त्यावर! मुंबई, रत्नागिरी, सांगलीत मगरींची दहशत; पाहा व्हिडिओ
Crocodile Viral VideoSaam Tv
Published On

कधीकाळी क्वचित नदी पात्रात दिसणारी मगर आता अगदी सर्रासपणे दिसू लागल्यात. जुलै महिन्यातील जोरदार पावसानं बहुतांश नद्यांना पूर आला. त्यामुळे अनेक ठिकाणी मगरी आता पात्राबाहेर येऊ लागल्यात. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये काही दिवसांपूर्वी एक अजस्त्र मगर रस्त्यावर फिरताना दिसून आली होती. चिंचनाका परिसरात या मगरीचं दर्शन झालं होतं.

स्थानिकांमध्ये या भल्यामोठ्या मगरीची भिती ताजी असताना शुक्रवारी पुन्हा चिपळूणच्या मेहता पेट्रोल पंपाजवळ एक मगर दिसली. ही मगर बिनधास्तपणे पेट्रोल पंपाजवळ फिरत होती. चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यातच नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळेच पात्रा बाहेर आलेल्या मगरी अन्नाच्या शोधात थेट रस्त्यावर फिरत आहेत. मात्र यामुळे चिपळूणकर चांगलेच धास्तावलेत.

नद्यांना पूर, मगरी रस्त्यावर! मुंबई, रत्नागिरी, सांगलीत मगरींची दहशत; पाहा व्हिडिओ
Local Train Video : लोकलने असा जीवघेणा प्रवास करू नका; मनाला चटका लावणारा व्हिडिओ पाहाच

दुसरीकडे सांगली जिल्ह्यातही मगरींची दहशत आहे. वाळवा तालुक्यातील चिकुर्डे इथं वारणा नदीतून मगर बाहेर आली आहे. चिकुर्डे येथील भोसले शिराळकर वस्तीत मगरीचं दर्शन झाल्यावर एकच घबराट उडाली. सांगलीतील कृष्णा नदी पात्रात यापूर्वीही मगरींचं अनेकदा दर्शन झालंय.

केवळ कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्रातच मगरी दिसतायेत असं नाही तर मुंबईतही मगरीचं दर्शन होतंय. बीकेसीत धीरूभाई अंबानी शाळेजवळील मिठी नदीच्या पात्रात 8 फुट लांब मगर आढळून आलीय. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पाण्याच्या प्रवाहात ही मगर वाहत आली असावी असा वन विभागाचा अंदाज आहे. मुंबईतील पवई तलावातूनही दोन दिवसांपूर्वी दोन मगर बाहेर पडल्या होत्या. त्यामुळे पर्यटकांना पवई तलावाच्या परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आलीये.

नद्यांना पूर, मगरी रस्त्यावर! मुंबई, रत्नागिरी, सांगलीत मगरींची दहशत; पाहा व्हिडिओ
Funny Video Viral : हा व्हिडिओ बघून हसू येईल, पण वाईटही वाटेल! झोका घेता-घेता झाडाची फांदी तुटली, तरुणाचं काय झालं बघा!

गोड्या पाण्यातील मगर सुमारे ४·५ मीटर लांब तर गढूळ पाण्यातील सुमारे ६ मी. पेक्षा अधिक लांब असते. पूर्ण वाढ झालेल्या मगरीचे वजन २००-२५० किग्रॅ असते. थेट नागरी वस्तीत मगरीचा वावर वाढल्यानं वन विभागानेही दक्ष राहून उपाययोजना आणि जनजागृती करणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com