Mumbai Goa Highway : गणपती बाप्पा मोरया! मुंबई-गोवा महामार्गावरून चाकरमान्यांचा प्रवास सुकर होणार, महत्वाची अपडेट आली समोर

Mumbai Goa Highway update : मुंबई-गोवा महामार्गावरून चाकरमान्यांचा प्रवास सोपा होणार आहे.या मार्गावरील अपूर्ण काम पूर्ण होणार आहे. या कामाविषयी महत्वाची अपडेट समोर आली आहे.
गणपती बाप्पा मोरया! मुंबई-गोवा महामार्गावरून चाकरमान्यांचा प्रवास सोपा होणार, महत्वाची अपडेट आली समोर
Mumbai Goa HighwayFile photos , Saam tv
Published On

विनायक वंजारे, साम टीव्ही प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : कोकणी बांधवांचा आवडता गणेशोत्सव सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्व कोकणी बांधवांची कोकणाकडे जाण्याची लगबग सुरु झाली आहे. अनेकांनी कोकणाकडे जाण्यासाठी तिकीटाची सोय करण्यास सुरुवात केली आहे. कोकणाकडे जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग महत्वाचा मानला जातो. या मुंबई-गोवा महामार्गाचे अपूर्ण काम लवकरच होणार आहे. या मुंबई-गोवा महामार्गाविषयी महत्वाची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.

रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग गणपतीपूर्वी पूर्ण होणार असल्याची नवी डेडलाईन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. रत्नागिरीत काही समांतर रस्ते व ब्रीजची कामे अपूर्ण आहेत. ते पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले आहे.

गणपती बाप्पा मोरया! मुंबई-गोवा महामार्गावरून चाकरमान्यांचा प्रवास सोपा होणार, महत्वाची अपडेट आली समोर
Eknath Shinde News : पुण्यात मुसळधार पाऊस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी प्रतिक्रिया

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा यात लक्ष घातलं आहे. त्यामुळे गणपतीत येणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही अडचण येता नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गणपतीपूर्वी येथील अडचणी सोडवण्यात येतील. तसेच महामार्गाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

गणपती बाप्पा मोरया! मुंबई-गोवा महामार्गावरून चाकरमान्यांचा प्रवास सोपा होणार, महत्वाची अपडेट आली समोर
Goa Monsoon Festival : गोव्यातल्या पावसाची मजाच न्यारी; मान्सूनमधल्या सणांमध्ये दडलेय इथली संस्कृती

मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचे निर्देश दिले आहे. या महामार्गावरील बायपास, सर्व्हिस रोड यांचे मजबुतीकरण करुन गणेशोत्सवापूर्वी मुंबई- गोवा महामार्ग खड्डेमुक्त करावा, करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तसेच १० ऑगस्टनंतर या महामार्गाच्या कामांची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com