वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकरी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आयएएस अधिकारी बनण्यासाठी फसवणूक केल्याप्रकरणी पूजा खेडकर यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यूपीएससीच्या तक्रारीनंतर पूजा खेडकर यांच्याविरोधात दिल्लीपोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकर यांना चौकशीसाठी नोटीस बजावली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना दिल्ली पोलिस नोटीस बजावणार आहेत. यूपीएससीने दाखल केलेल्या गुन्ह्या प्रकरणी चौकशीसाठी हजर राहावे यासाठी नोटीस पाठवली जाणारा आहे. दिल्ली पोलीस नोटीस बजावणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
यूपीएससीने दिल्ली पोलिसांकडे पूजा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. नाव बदलून यूपीएससीची परीक्षा देणं, आईचे नाव बदलणे, वडिलांचे नाव आणि सही बदलणे, पत्ता बदलणे अशा पद्धतीने बनावट डॉक्युमेंट सादर केल्या प्रकरणी पूजा खेडकर यांच्या वरतीगुन्हा दाखल करण्यात आला आहे.नोटीस आल्यानंर पूजा खेडकर दिल्ली पोलिसांनी च्या चौकशीला हजर राहणार का याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पूजा खेडकर यांनी याआधी मसुरी येथील लालबहाद्दुर शास्त्री प्रशासकीय अकादमीच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. २३ जुलैपर्यंत पूजा खेडकर यांना मसुरी येथे अकादमीत पोहचण्याचे आदेश देण्यात आले होते. पण पूजा खेडकर तिकडे फिरकल्याच नाहीत. पूजा खेडकर या सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यांचा फोन लागत नाहीये. त्यांना पुणे पोलिसांनी देखील चौकशीसाठी दोन वेळा नोटीस पाठवली होती. पण त्या चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.