ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीचे एक प्रवेशद्वार म्हणून पनवेल शहरास ओळखले जाते.
मुंबई शहरापासून काही अंतरावर असलेले हे ठिकाण अनेक पर्यटन स्थळांसाठी लोकप्रिय आहे.
चला तर पनवेल शहरापासून जवळील काही पर्यटन स्थळांबद्दल पाहूयात
पनवेल शहरापासून काही अंतरावर कर्नाळा किल्ला आहे.हे ठिकाण पक्षी अभयारण्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे.
पावसाळ्यात माणिकगड किल्ला हिरवाईने सजून जातो. दरवर्षी पावसाळ्यात अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात.
पनवेल शहरापासून काही अंतराव गाडेश्वर धरण आहे. पावसाळ्याच्या दिवसात येथे येणे म्हणजे एक पर्वणीत असते.
जगप्रसिद्ध असलेले माथेरान हे ठिकाण पनवेल शहरापासून काही अंतरावर आहे. प्रत्येक दिवशी या ठिकाणी तुम्हाला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते.