Abdul Sattar: 'बिबट्या राष्ट्रीय प्राणी', व्याघ्र दिनालाच अब्दुल सत्तार यांचं अजब वक्तव्य; पाहा व्हिडिओ

Abdul Sattar On National Tiger Day: आज जागतिक व्याघ्रदिन आहे. मात्र जागतिक व्याघ्रदिनीच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी असल्याचं अजब विधान केलंय. शिवसेनेच्या 'वाघा'नं बिबट्याला राष्ट्रीय प्राणी म्हटल्यानं वाद निर्माण झालाय. वादाशी जवळचं नातं असलेल्या सत्तारांनी नेमकं का आणि काय विधान केलं.
'बिबट्या राष्ट्रीय प्राणी', व्याघ्र दिनालाच अब्दुल सत्तार यांचं अजब वक्तव्य; पाहा व्हिडिओ
Abdul Sattar On National Tiger DaySaam Tv
Published On

भारताचा राष्ट्रीय प्राणी कोण? असा प्रश्न विचारताच शाळकरी मुलगाही सहज उत्तर देईल. वाघ... मात्र राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांना या प्रश्नाचं उत्तर ठाऊक नाही. विशेष म्हणजे २९ जुलै या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनालाच. शिवसेनेच्या या 'वाघाने' आजच्या दिवशीच चक्क बिबट्याला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केलंय. सत्तार म्हणाले आहेत की, बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी असून त्याला सुरक्षित ठेवण्याचे काम वन विभागाचे अधिकारी करत आहेत.

संभाजीनगरात खरंतर गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत आहे. शहराच्या मध्य भागातील उल्कानगरीत तसेच सिडको भागातील एका मॉलच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या दिसला होता. 6 पथकं, 100 कर्मचारी, एक गनमॅन दोन आठवड्यापासून बिबट्याचा शोधात आहेत.

'बिबट्या राष्ट्रीय प्राणी', व्याघ्र दिनालाच अब्दुल सत्तार यांचं अजब वक्तव्य; पाहा व्हिडिओ
Viral Video: तुमच्या किचनमध्ये मोबाईल 'बॉम्ब', मोबाईलमुळे सिलिंडरचा स्फोट? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

मात्र या हुशार बिबट्यानं सगळ्यांनाच हुलकावणी दिली आहे. आता नवनियुक्त पालकमंत्र्यांनी बिबट्याला तीन दिवसात पकडण्याचे आदेश दिलेत. अब्दुल सत्तार म्हणाले आहेत की, लवकरात लवकर बिबट्याला जंगलात सोडण्यात येईल, जेणेकरून तो सुरक्षित राहील.

'बिबट्या राष्ट्रीय प्राणी', व्याघ्र दिनालाच अब्दुल सत्तार यांचं अजब वक्तव्य; पाहा व्हिडिओ
Pakistani Air Hostess : पाकिस्तानी हवाईसुंदरीचा चक्रावणारा कारनामा उघड; परदेशी चलनाची तस्करी करताना रंगेहाथ सापडली; पाहा व्हिडिओ

सत्तार हे त्यांच्या कोणत्या ना कोणत्या राजकीय वक्तव्यामुळे नेहमीच वादात साप़डतात. मात्र यावेळी त्यांनी थेट राष्ट्रीय प्राण्याबाबत अकलेचे तारे तोडल्यानं नव्या वादात सापडले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com