नवी दिल्ली : पाकिस्तानी सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या एका हवाईसुंदरीचा चक्रावून टाकणारा कारनामा समोर आला आहे. पाकिस्तान इंटरनॅशन एअरलाइन्सची हवाईसुंदरी डॉलर आणि रियाल सारख्या परदेशी चलनाची तस्करी करताना रंगेहाथ सापडली. या हवाईसुंदरीने बुटाच्या सॉक्समध्ये परदेशी चलन लपवून तस्करी करत होती. या चलनाचं पाकिस्तानात लाखो रुपयांचं मुल्य आहे.
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सला तस्करी करताना सापडल्यानंतरचा व्हिडिओही समोर आला आहे. एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी तिच्या बुटातील सॉक्समधून नोटा बाहेर काढल्या. ही हवाईसुंदरी अल्लामा इकबाल इंटरनॅशनल विमानतळावर रंगेहाथ सापडली. एफआयए एजन्सीने कस्टम अधिकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई केली आहे. या अधिकाऱ्यांनी हवाईसुंदरीच्या सॉक्समधून अमेरिकी डॉलर आणि सौदीचे रियाल जप्त केले आहेत.
कारवाईनंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'हवाईसुंदरीजवळ ३७,३१८ डॉलर आणि ४० हजार सौदी रियाल आळढले. ती लाहोरहून जेद्दा येथे चालली होती. संशय आल्यानंतर तिला विमानातून उतरण्यास सांगितलं. त्यानंतर तिची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर तिच्याजवळील नोटा जप्त करण्यात आल्या. या हवाईसुंदरीविरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर तपास पथकाकडे सोपवलं. लाहोर विमानतळावर तिच्यावर कारवाई करण्यात आली.
याआधी देखील तिला ताब्यात घेण्यात आलं होतं. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचं विमान कॅनडाला पोहोचल्यानंतर हवाईसुंदरी हिना सानीला दुसऱ्या पासपोर्ट वापरण्याप्रकरणी ताब्यात घेतलं होतं. तिच्याजवळ वेगवेगळे पासपोर्ट आढळले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, हिनाला याआधी देखील प्रतिबंधित वस्तू आणणल्याबद्दल ताकीद देण्यात आली होती.
दरम्यान, पाकिस्तान एअरलाईन्सचे कर्मचारी बेपत्ता होण्याचेही प्रकार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी नूर शूरचं प्रकरण समोर आलं होतं. पाकिस्तानहून टोरंटोला जाणाऱ्या विमानाचा फ्लाइट इटेंडेंट टीमचा नूर शूर हा सदस्य आहे. नूर शेर हा बेपत्ता झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. शेर बेपत्ता झाल्याने विमानाचं उड्डाण करण्यास पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स अपयशी ठरलं. मागील वर्षी एक पुरुष आणि महिला बेपत्ता झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.