Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर ऑनर किलिंग प्रकरण: धमकी देऊन खून करणारा भाऊ अखेर अटकेत

Chhatrapati Sambhajinagar Latest News: छत्रपती संभाजीनगर शहरातील इंदिरानगर भागात आंतर धर्मीय विवाह केल्याच्या रागातून सासरा आणि भावाने जावयाचा खून केल्याची घटना घडली होती.
Chhatrapati Sambhajinagar Latest News
Chhatrapati Sambhajinagar Latest NewsSaamtv
Published On

रामनाथ ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. २८ जुलै २०२४

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली होती. मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडील आणि भावाने तिच्या पतीची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संभाजीनगर शहर हादरुन गेले होते. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली असून हत्या करणाऱ्या भावाला अटक करण्यात आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Latest News
Pune Dengue Cases: पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यूचे ३८९ संशयित रुग्ण, झिका व्हायरस, चिकुनगुनियाचेही पेशंट वाढले

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरातील इंदिरानगर भागात आंतर धर्मीय विवाह केल्याच्या रागातून सासरा आणि भावाने जावयाचा खून केल्याची घटना घडली होती. 14 जुलै रोजी घडलेल्या घटनेनंतर मारेकरी सासरा गीताराम भास्कर कीर्तीशाही आणि त्याचा पुतण्या आप्पासाहेब अशोक कीर्तीशाही हे खून करून पसार झाले होते.

पोलिसांनी त्या दोघांचा शोध घेतला असून त्यापैकी आप्पासाहेब अशोक कीर्तीशाही याला फुलंब्रीतून ताब्यात घेण्यात आले आहे. आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून या दोघांनी जावई अमित साळुंखे याचा खून करून आपल्या पाहुण्याकडे आश्रय घेत होते. याबाबतची माहिती मिळताच पोलीस उपयुक्त नितीन बागडे यांच्या विशेष पथकाने त्याला फुलंब्रीतून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Chhatrapati Sambhajinagar Latest News
Worli Crime News : मुंबईच्या स्पा सेंटरमध्ये 'गजनी'चा मर्डर; 'टॅटू' ठरला खुन्यांचा कर्दनकाळ

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच विद्या आणि अमित यांनी आंतरजातीय विवाह केला होता. विद्याच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. याच रागातून 14 जुलै रोजी विद्याचे वडिल आणि चुलत भावाने अमितची निर्घृण हत्या केली. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त असून दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे.

Chhatrapati Sambhajinagar Latest News
Sangli Kolhapur Flood: सांगलीकरांना दिलासा! 'कृष्णे'च्या पाणी पातळीतील वाढ मंदावली, कोल्हापूरात 'पूराची' स्थिती काय? वाचा..

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com